22 November 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

“वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते”....संभाजी भिडेंचं स्त्रियांबद्दल संतापजनक वक्तव्य

Sambhaji Bhide

पुणे: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली आहे. यावेळेस त्यांनी थेट गरोदर स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुलं नसणाऱ्या स्त्रियांचा आक्षेपार्ह शब्द वापरत भिडे यांनी उल्लेख केला आहे. हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वाबद्दल बोलताना भिडे यांनी “वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते,” असं वक्तव्य केलं आहे. सांगलीमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

तत्पूर्वी संभाजी भिडे यांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जेव्हा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा येतो, तेव्हा हिंदू समाज नपुंसक होऊन जातो, असं ते म्हणाले. शिवाय त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं समर्थनही केलं. मुस्लिमांकडून राष्ट्रीयत्वाची अपेक्षा करणं हा मूर्खपणा असल्याचंही ते म्हणाले. जगभरात सीएए कायदा आहे, मग भारतातच का नको? भारतीयांना जोडणाऱ्या या कायद्याबाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोपही संभाजी भिडे यांनी केला.

या कायद्याच्या समर्थनार्थ सोमवार शिवप्रतिष्ठानच्यावतीने सांगलीत मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. भिडे म्हणाले की, राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर नेहमीच स्वार्थी भूमिका घेतली जाते. स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारे लोकच त्यात आघाडीवर आहेत. मुळात हिंदू समाजात राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर नपुसंकता आहे. ही गोष्ट आताची नाही, तर शेकडो वर्षापासून हेच घडत आहे. केंद्र सरकारने कलम ३७०, तिहेरी तलाक आणि आता नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणून देशाला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही मंडळी या कायद्याचा अपप्रचार करत, देशात दंगली घडवत आहेत.

तत्पूर्वी संभाजी भिडे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत असं वक्तव्य केलं होतं. आपला देश माणसांचा आहे, पण देशभक्तांचा नाही हे दुर्दैव आहे. स्वार्थ हाच धर्म असणारे कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्यामुळे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येत भारतीयाला आनंद झाला पाहिजे. देशभक्त असणारा प्रत्येक नागरिक या कायद्याचं समर्थन करेल. याला विरोध करणारे देशद्रोही आहेत असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

 

Web Title:  Sambhaji Bhide insult Women’s during one statement over Hindu Community.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x