22 November 2024 1:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पवारांची साथ सोडणारे आ. राणाजगजितसिंह पाटील राजकीय अडचणीत

BJP MLA Rana Jagjitsigh Patil

उस्मानाबाद: आज राष्ट्र्वादीत असते तर मंत्रीपदी वर्णी निश्चित असली असती, मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी लाटेच्या आशेवर भारतीय जनता पक्षात उडी घेऊन पवार कुटुंबियांशी दगा करणारे आमदार राणा राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील सध्या राजकीय पेचात पडण्याची शक्यता आहे. मूळ मतदारसंघ सोडून दुसऱ्याच मतदारसंघातून ते निवडून आले खरे, मात्र त्यांचं उस्मानाबाद’मधील राजकीय भविष्य धिक्यात येऊ शकतं.

सध्या पवार कुटुंबीय देखील साथ देतील अशी शक्यता असून भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं असं कोणताही स्थानिक पातळीवर अस्तित्व नाही. आता मंत्रीपदी देखील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बसले असताना त्यांना स्थानिक पातळीवर राजकीय फटके बसण्याची शक्यता अधिक असून त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची हातमिळवणी होण्याची शक्यता आहे. साखर सम्राट असलेले पाटील कुटुंबीय भाजप प्रवेशानंतर वेगळ्याच राजकीय सापळ्यात अडकल्याचं म्हटलं जातं आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील यांच्यासह १२ लोकांवर अकलुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीच्या प्रकरणातुन हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. पंचायत समिती सभापती निवडणूक ३१ तारखेला असून, आमदार पाटील यांचे काही सदस्य गायब होते. या प्रकाराच्या रागातून आमदार पाटील बोरगाव येथे हिंम्मतराव पाटील यांच्या बंगल्यावर गेले.

तेव्हा शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पळवुन नेण्यासाठी आमदार पाटील यांनी हिंम्मतराव पाटील यांच्या बंगल्यात घुसून रिव्हॉल्व्हर रोखून सदस्य देण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या ठिकाणी घटनास्थळावरुन सतिश दंडनाईक व गणेश भातलवंडे यांना गावकर्‍यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेनंतर भाजपाचे आमदार राणाजगजित सिंह यांच्यासह काही लोकांनी तेथून पळ काढला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरुन चार जण ताब्यात घेतले असुन, इतरांनी वाहने सोडुन पळ काढल्याने वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. कळंब पंचायत समितीचे आमदार पाटील यांचे सदस्य अजुनही गायबच असल्याचे समोर आले आहे. सध्या ही पंचायत समिती आमदार पाटील यांच्या गटाकडे आहे. मात्र खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या गळाला त्यांचे सदस्य लागले आहेत. त्यावरुनच हा वाद पेटला होता. आमदार पाटील व खासदार राजेनिंबाळकर यांच्यात पारंपरिक राजकीय संघर्षाला या प्रकरणाने अजून धार आली आहे. आमदार पाटील यांच्या हातून पंचायत समिती जाणं हे राजकीयदृष्ट्या त्यांना मोठा धक्का मानला जाणार आहे.

 

Web Title:  Osmanabad BJP Party MLA Rana Jagjitsigh Patil in danger Zone.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x