22 November 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

#CAA : योगी सरकार आणि पोलिस यंत्रणा सूडबुद्धीने काम करत आहेत: प्रियंका गांधी

Priyanka Gandhi Vadra, Uttar Pradesh, CAA, NCR

लखनौ: उत्तर प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांकडून अराजकता पसरवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहितीचे १४ पानांचे एक पत्रही त्यांनी उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे भेट घेऊन सुपूर्द केले. आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत प्रियंका गांधी यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना धमकी दिली जात आहे. ७७ वर्षीय माजी पोलीस अधिकारी दारापुरी यांच्या त्यांच्या घरातून अटक केली. त्यांचे नाव ४८ लोकांच्या यादीत आहे. आम्ही राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. भगवे वस्त्र परिधान करतात, ते आम्हाला शांती आणि करूणा शिकवतात. पण, सूडबुद्धीने वागायचे शिकवत नाहीत, असे म्हणत प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.

राज्यापालांना लिहिलेल्या पत्रात या घटनांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. तसेच आंदोलनांदरम्यान पोलिसांनी तोडफोड केलेल्या खासगी आणि सार्वजनिक संपत्तीचे व्हिडिओ देखील सुपूर्द करण्यात आले आहेत. राम, कृष्ण यांसारख्या करुणापूर्ण देवांच्या देशात अशा घटना घडत असल्याचे दृर्देवी असल्याचे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

 

Web Title:  Congress leader Priyanka Gandhi Vadra Demand Judicial Investigation UP Police Brutality During Demonstrations.

हॅशटॅग्स

#PriyankaGandhi(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x