मुलांना मोबाईल'पासून दूर ठेवा; स्मार्टफोनवर पॉर्न पाहण्यात भारत जगात अव्वल: रिपोर्ट
नवी दिल्लीः भारतात ज्या वेगात स्मार्टफोनची विक्री सुरू आहे त्याच वेगात स्मार्टफोनवर पॉर्न (ब्लू फिल्म) पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २०१९ या वर्षात भारतात सर्वात जास्त पॉर्न पाहिले गेले आहे. भारतानंतर अमेरिकेत सर्वात जास्त पॉर्न पाहिले गेले आहे. एका रिपोर्टमधून ही माहिती उघड झाली आहे.
भारतात २०१९ मध्ये ८९ टक्के लोकांनी मोबाइलवर पॉर्न पाहिले आहे. ही आकडेवारी २०१७ च्या तुलनेत ३ टक्के जास्त आहे. २०१७ मध्ये भारतात मोबाइलवर पोर्न पाहणाऱ्यांची संख्या ८६ टक्के होती. ती २०१९ मध्ये ३ टक्क्यांनी वाढली आहे. अडल्ट इंटरनेटमेंट साईट पॉर्न हबच्या माहितीनुसार, जगभरात ४ लोकांपैकी ३ जण मोबाइलवर पॉर्न पाहतात. हातात मोबाइल आल्यापासून लोक आता डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर पोर्न पाहत नाहीत. लोक पॉर्न पाहण्याला मोबाइलला प्राधान्य देतात. त्यानंतर ते लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर पॉर्न पाहतात. मोबाइलवर पॉर्न पाहण्यात भारत अव्वल असून दुसऱ्या नंबरवर अमेरिका आहे.
“India, US, Brazil lead #pornconsumption on smartphones in 2019″ from @ummid @Pornhub @appannie #PornBan #YearInReview https://t.co/n3Dc12TmpT pic.twitter.com/LaxcPqlV3Z
— CAM4 Male (@cam4_gay) January 1, 2020
पॉर्नहबच्या इयर इन रिव्ह्यू रिपोर्टमध्ये ही माहिती उघड झाली आहे. २०१३ मध्ये पॉर्नहबच्या एकूण ट्रॅफिकमध्ये मोबाइल ट्रॅफिकची भागीदारी ४० टक्के होती. मोबाइलवर पॉर्न पाहण्याचा ट्रेंड सर्व प्रमुख पॉर्नहब मार्केटवर पाहिला गेला आहे. स्वस्त डेटा प्लान आणि महागड्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी झाल्याने देशात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भारतात ४५० मिलियनहून अधिक स्मार्टफोन युजर आहेत. स्वस्त मोबाइल इंटरनेट उपलब्ध असल्याने लोकांना मोबाइलवर इंटरनेट सर्फिंग करणे खूपच सोपे झाले आहे. भारतात एका स्मार्टफोनवर ९.८ जीबी प्रति महिना खर्च होत आहे. २०२४ पर्यंत हे दुप्पट होईल, असा अंदाज आहे.
तत्पूर्वी, संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यांनी या पत्रात इंटरनेटवरील पॉर्न साईट्स आणि अश्लिल मजकुरावर बंदी घालण्याची मागणी केली होती. बलात्कारासारख्या घटनांसाठी पॉर्न साईट्सच जबाबदार असतात, असं वक्तव्य यापूर्वी त्यांनी केलं होतं.
इंटरनेटवरील लोकांच्या अमर्याद प्रवेशामुळे मुले आणि तरुण अश्लील, हिंसक आणि अनुचित सामग्री पाहत आहेत. जे अनिष्ट आहे. इंटरनेटच्या प्रभावामुळे अशा काही घटना घडत असतात. बर्याचदा अशा प्रकरणांमध्ये गैरवर्तनाच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडिया – व्हॉट्सअॅप, फेसबुक इत्यादीवर तयार केले जातात आणि व्हायरल केले जात आहे. विशेषकरून या प्रकारच्या सामग्रीचा लहान मुले आणि काही तरूणांच्या मेंदूवर गंभीर परिणाम होत आहे, असे नितीश कुमार यांनी पत्रात म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात सरकारला अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र, इंटरनेट सेवा देणाऱ्यांनाही कडक सूचना देणे आवश्यक आहे. याशिवाय, पालक, शैक्षणिक संस्था आणि अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने सर्वसमावेशक जागरूकता मोहीम राबविणे देखील आवश्यक असल्याचेही नितीश कुमार यांनी पत्रात नमूद केले होते.
अशा प्रकारच्या डेटामुळे अनेकांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तसंच महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. परंतु त्यांची योग्यरित्या अंमलबजावणी होत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं होते.
Web Title: India became Number one in porn watching on Smartphones in year 2019 and america on second rank.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL