25 November 2024 1:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

सातारा: शहीद संदीप सावंत अमर रहे! लष्करी इतमामात अखेरचा निरोप

Satara, Indian Army Solder Sandeep Raghunath Sawant

सातारा: दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात येतो आहे. हा नरोप देताना महाराष्ट्रही गहिवरला आहे. संदीप सावंत यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वेळापूर्वीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आले. त्यांची अवघी काही महिन्यांची असलेली मुलगी पोरकी झाली. संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावातले सगळे लोक जमले. शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

शहीद नाईक संदीप सावंत यांचे पार्थिव जम्मू काश्मीरहून पुण्याला आणले गेले. त्यानंतर त्यांचे पार्थिव साताऱ्यातील कराड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथील नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव मुंढे येथे अंत्यदर्शनासाठी आणले गेले. येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जम्मू-काश्मीरमध्ये २ जानेवारीला पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत सातारच्या जवान वीरमरण आलं होतं. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना संदीप सावंत शहीद झाले. शहीद संदीप सावंत हे कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवाशी आहेत. संदीप यांचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता. त्यांना अवघ्या दोन महिन्यांची मुलगी आहे. संदीप सावंत शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण मुंढे गावावर शोककळा पसरली आहे.

 

Web Title:  Shaheed Indian Army Solder Sandeep Raghunath Sawant Funeral Last Tribute to Martyr Jawan of Satara.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x