25 November 2024 9:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

एकीकडे मंत्री नाराज आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

MNS, Raj Thackeray

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचे रखडलेले बहुचर्चित खातेवाटप तब्बल ७ दिवसांनंतर अखेर रविवारी सकाळी जाहीर करण्यात आले. पसंतीची खाती न मिळाल्याने काही मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली. राजीनाम्याची हूल दिलेले शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना ‘मातोश्री’वर समज देण्यात आली. राष्ट्रवादीत धक्कातंत्राचा अवलंब करण्यात आल्याने ज्येष्ठ नेत्यांची पंचाईत झाली, तर मंत्रिपदे न मिळालेल्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे सांगण्याची वेळ काँग्रेसवर आली. एका बाजूला असं चित्र असताना दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र मनसेकडे जात असल्याचं दिसत आहे.

कारण महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात खदखद दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना-राष्ट्रवादीच्या हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती धरला. यामध्ये रायगडमधील पेण, मुरुड भागातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय विविध शहरं, तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट धरली आहे.

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक बदल होताना काही काळात दिसणार आहेत. येत्या २३ तारखेला मनसेचं मुंबईत पहिला महाधिवेशन भरणार आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षातील संघटनेत तसेच भूमिकेत बदल करणार असल्याची माहिती मिळत आहे. मराठी कार्डचा प्रभाव निवडणुकीच्या निकालात दिसत नसल्याने मनसे सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळणार असल्याचीही चर्चा आहे.

 

Web Title:  Thousands of NCP and Shivsena Activists enraged MNS Raj Thackarey in Mumbai.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x