25 November 2024 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

साहित्य संमेलनाला जाऊ नका; ब्राह्मण महासंघाने महानोरांना दिली धमकी

Brahman Mahasangh Pune, Marathi Sahitya Sammlan, Father Francis Dbritto

उस्मानाबाद: येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी ब्राह्मण महासंघाने संमेलनाचे उद्घाटक कविवर्य ना. धों. महानोर यांना दिली आहे. ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ शुक्रवार १० जानेवारी पासून होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला आलेल्या या धमकीमुळे आयोजक चिंतेत आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यापासून हे संमेलन वादात सापडले आहे. दरम्यान, संमेलनाला जाऊ नये अशी फोनवरून धमकी मिळाल्यानंतरही ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर उपस्थित राहणार आहेत.

“१० जानेवारी रोजी सुरु होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड एकमताने करण्यात आली. ही निवड प्रक्रिया करण्याची एक पद्धत आहे तो संकेत पाळूनच ही निवड झाली आहे. यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही” हे सगळं मी त्यांना समजावून सांगितलं मात्र तरीही त्यांनी तुम्ही साहित्य संमेलनाला जाऊ नका असं मला बजावलं आहे असं महानोर यांनी स्पष्ट केलं.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, धमकी हा शब्द माझ्या हिशोबात बसत नाही. धमकी मला दिलेली नाही, माझ्याशी फोनवरून संवाद साधण्यात आला. तसेच एक पत्र मला देण्यात आलं आहे. ब्राम्हण महासंघ पुण्याचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्र पाठवून सविस्तरपणे आपलं मत मांडलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड आम्हाला मान्य नाही. त्यांचं लेखन, त्यांची विचारसरणी हे आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे आम्ही पत्रकं काढून त्याचा निषेध करणार आहोत.’ पुढे बोलताना ना. धो महानोर म्हणाले की, नियमानुसार एकमताने दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच नसून मी संमेलनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, महानोर यांना कोणी धमकी दिली याची चौकशी पोलिसांना करण्यास सांगितलं आहे. तात्काळ पोलिस संरक्षण देण्याचे संबंधित जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सांगितलं असल्याचं ते म्हणाले. यासंबंधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महानोर यांनी संमेलनाला जाऊ नका, असं पत्र आल्याचं मान्य केलं. पण तरीही ते उस्मानाबादला दाखल झाले आहेत.

 

Web Title:  Na Dho Mahanor threatened by Brahman Mahasangh Pune against Marathi Sahitya Sammlan Father Francis Dbritto.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x