22 November 2024 6:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आंध्र प्रदेश: शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात थेट जमा होणार १५ हजार

Andhra Pradesh Chief Minister Jagan Reddy, Amma Vodi Scheme, School Going Children

हैदराबाद: आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या महिलांच्या खात्यात वर्षाला १५ हजार रुपये देण्याची सरकारची योजना असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याची घोषणा केली आहे.

हे पैसे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. जोपर्यंत मुलांचं शालेय शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे गरीब महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. ‘अम्मा वोडी’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ राज्यातील ८२ लाख मुलांना होईल.

या योजनेच्या अंतर्गत ४३ लाख मातांच्या खात्यात दर वर्षी १५ हजार रुपये जमा करण्यात येतील. लॅपटॉपचं बटन दाबून रेड्डींनी या योजनेचा शुभारंभ केला. तिरुपतीपासून ७० किलोमीटरवर असलेल्या चित्तूरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना रेड्डींनी या योजनेची माहिती दिली. ‘राज्यातील ८२ लाख मुलांना अम्मा वोडी योजनेचा फायदा होईल. सरकार जवळपास ४३ लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार असून यावर ६,३१८ कोटी रुपये खर्च होतील,’ असं रेड्डींनी सांगितलं.

 

Web Title:  Andhra Pradesh Chief Minister Jagan Reddy Amma Vodi Scheme for below Poverty women with School Going Children.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x