25 November 2024 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

पोलिसांची भूमिका पूर्वग्रहदूषित; माझ्यावर हिंसाचाराचा ठपका पण गुन्हा दाखल नाही

JNUSU President Aishe Ghosh, JNU Attack, Delhi Police

नवी दिल्ली : JNU हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांची भूमिका पूर्वग्रहदूषित आहे असा आरोप JNUSU ची अध्यक्ष आयशी घोषने केला आहे. “आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्यावरही हिंसाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे, मात्र माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. माझ्याकडेही माझ्यावर हल्ला कसा झाला याचे पुरावे आहेत” असंही आइशीने म्हटलं आहे. “आम्ही काहीही चुकीचं वागलो नाही. आम्ही दिल्ली पोलिसांना घाबरत नाही. आम्ही लोकशाही मार्गाने सगळ्या प्रश्नांचा सामना करु. दिल्ली पोलीस पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन ठेवून वागत आहेत असाही आरोप आयशी घोषने केला.

रविवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोष हिच्यासह ९ हल्लेखोर होते. प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये आरोपींची नावंही देण्यात आली आहेत. यात जेएनयूचे माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता तालुकदार आणि प्रिया रंजनदेखील आहे.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. जेएनयूत नोंदणी करण्यास डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचा विरोध होता. १ जानेवारी ते ५ जानेवारीच्या दरम्यान नोंदणी प्रक्रिया थांबवण्यापासून ते सर्व्हरची तोडफोड करण्यापर्यंत आणि पेरियार तसेच साबरमती हॉस्टेलमध्ये झालेल्या हिंसेचा तपशील यावेळी पोलिसांनी दिला.

३ जानेवारी रोजी स्टुडंट फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशनचे सदस्य मध्यवर्ती नोंदणी प्रक्रियेची यंत्रणा रोखण्यासाठी सर्व्हर रुममध्ये घुसले. त्यानंतर त्यांनी सर्व्हर बंद करून कर्मचाऱ्यांना रुमच्या बाहेर काढलं. ४ जानेवारी रोजी पुन्हा त्यांनी सर्व्हर बंद करण्याचा प्रयत्न केला. दुपारी काचेच्या दरवाज्यातून काही विद्यार्थी आतमध्ये घुसले आणि त्यांनी सर्व्हर सिस्टीमची तोडफोड केली. त्यामुळे नोंदणीची सर्व प्रक्रिया थांबली. या दोन्ही प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान 5 जानेवारी रोजी पेरियार आणि साबरमती वसतिगृहातील काही खोल्यांवर करण्यात आलेला हल्ला पूवनियोजित असल्याचे टिर्की यांनी सांगितले. तसेच काही व्हॉट्सअँप ग्रुपही तयार करण्यात आले होते. मास्क लावून ज्यांनी हल्ले घडवले त्यांना ठाऊक होतं की कुठे हल्ले करायचे व कोणत्या खोल्या फोडायच्या हे ठरवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे यासंदर्भात आम्ही आत्तापर्यंत ३० ते ३२ साक्षीदारांशी चर्चा केली आहे असंही जॉय टिर्की यांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी आइशी घोषवर आरोप केल्यानंतर मी कोणतीही चूक केली नसून माझी खुशाल चौकशी करा असं आइशी म्हणाली. तसेच माझ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे माझ्याकडेही पुरावे आहेत असं देखील आइशी घोषने सांगितले आहे.

मागच्या रविवारी काही मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काही विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोष आणि इतर काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तेव्हापासून हा विषय देशाच्या राजकारणात पेटला आहे. या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. यावरुन सध्या राजकारणही चांगलंच पेटलं आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरुन सत्ताधारी पक्षाला म्हणजे केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Web Title: We are not scared of Delhi Police says JNUSU President Aishe Ghosh after police press conference over investigation.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x