22 November 2024 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

पुणे: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; अपघात बाप-लेकीचा जागीच मृत्यू

Father and Daughter Dead in accident

पुणे: यात्रेसाठी गावी जाणाऱ्या बाप-लेकीवर वाटेतच काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तीन वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावर भीमा नदीवरील पुलावर शनिवारी ही घटना घडली. या घटनेमुळे निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.

सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील (वय-३५), मुलगी आरोही सतीश वळसे-पाटील (वय-३, सर्व रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) अशी मृत बाप-लेकीची नावे आहेत. सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील यांची जयश्री या जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वळसे-पाटील कुटुंबीय थापलिंग यात्रेनिमित्त गावाला निघाले होते. पण, सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पुणे बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.१५ जी.बी. ७२७५) भीमानदी पुलावर पाठीमागून दुचाकीला ( एमएच १४ डीएल १५५७ ) जोरदार धडक दिली. यामध्ये सतीश वळसे-पाटील व मुलगी आरोही हे दोघेही ट्रकच्या पाठीमागील चाकाच्या खाली येऊन जागीच मृत्यूमुखी पडले. तर, पत्नी जयश्री याही गंभीर जखमी झाल्या आहेत.

या अपघातानंतर, परिसरातील नागरिकांनी मुलगी व वडिलांना तत्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

 

Web Title:  Father and Daughter died in road accident at Pune Rajgurunagar.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x