22 November 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

सरकार'कडे पैसा नाही, मी पीपीपी आणि बीओटी तत्वावर कामे केली: गडकरी

Union Minister Nitin Gadkari, Advantage Maharashtra Industrial Expo, Aurangabad

औरंगाबाद: सरकार कोणत्याही पक्षाचे असू द्या, सगळ्या गोष्टीचे सोंग करता येते, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. सरकारजवळ पैसेच नाहीत, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत दिली. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ)तर्फे ९ ते १२ जानेवारी दरम्यान ऍडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो घेण्यात आला. याचा रविवारी समारोप झाला. यावेळी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी बोलत होते.

आमचे राजकारणी हरले की, आम्हाला हरवलं गेल असं सांगतात. आपण कुठं कमी पडलो हे ते बोलत नाहीत. दुसऱ्यांना दोष देतात. दुनिया झुकती है, लेकिन झुकानेवाला चाहिए, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वकीयांना मोलाचा सल्ला दिला आहे. औरंगाबादेत औद्योगिक प्रदर्शनाला गडकरींनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. पुढे गडकरी म्हणाले की, ‘कटआऊट लावून कुणी नेता होत नाही, मी आयुष्यात कधीही कटआऊट लावले नाही. तुमच्याकडे दर्जा असेल तर लोक तुमच्या सोबत असतील. राजकारणात सुद्धा असंच आहे.

मी जॉर्ज फर्नांडिस यांना आदर्श मानतो. मी विजयी झालो, तर माझ्या स्वागताला कुत्रं पण येत नाही. विमानतळावर स्वागताला यायची काय गरज आहे? मी माझ्या आयुष्यात २० रुपये खर्चून एकही बॅनर लावलं नाही, असंही गडकरींनी नमूद केलं. आपल्या देशाचा विकास होत असताना सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे असे आपण म्हणतो. तशी आर्थिक समानता सुद्धा तयार झाली पाहिजे , त्यामुळे गरीब पीडित माणसाला केंद्रबिंदू मानून आर्थिक धोरणे ठरवली पाहिजेत.आपल्या देशात गरिबी कमी करायची असेल तर रोजगार उपलब्ध केले पाहिजेत. असही ते म्हणाले.

यावेळी स्पेशल सेक्रेटरी मोहन मिश्रा, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, एक्‍स्पो समन्वयक सुनील किर्दक उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या एक्‍स्पोचे कौतुक करीत श्री.नितीन गडकरी म्हणाले, ”सरकारजवळ पैसा नाही. मी केंद्र सरकारच्या बजेवटर काम करीत नाही. गेल्या पाच वर्षांत १७ लाख कोटींची कामे केली, आगामी काळातील पाच वर्षांत १२ ते १५ कोटींचे रस्त्याचे काम करणार आहे. तुम्ही म्हणाल यासाठी पैसे कुठून आले. स्टेट बॅंकेचे चेअरमन माझ्याकडे आले. ५० हजार कोटी रूपये देऊन गेले. एलआयसीचे चेअरमन आले २५ हजार कोटी देऊन गेले.” सगळे बॅंकांचे चेअरमन आपल्या मागे लागल्याचे सांगत, पीपीपी आणि बीओटी तत्वावर ही कामे केल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title:  Advantage Maharashtra Industrial Expo Union Minister Nitin Gadkari in Aurangabad.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x