22 November 2024 5:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

बंधूंमध्ये राजकीय फूट? वंचित'च्या अपयशामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य: आनंदराज आंबेडकर

Republican Sena, Anandraj Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर यांनी आपली भविष्यातील भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे यावेळी आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचंही म्हटलं.

पुढे बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीला आम्ही पाठिंबा दिला होता, पण वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे. वंचितला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाज वंचित आघाडीबाबत निराश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आलेले ओबीसी नेते हे खरे ओबीसी समाजाचे नेते होते का? हा प्रश्न आहे. त्यामुळे वंचित आघाडी समाजापर्यंत पोचली का हा देखील गंभीर प्रश्न आहे. वंचित सोबत जोडल्या गेलेल्या इतर घटकांचे मतदान वंचितला मिळाले का हा देखील मोठा प्रश्न आहे.”

लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर केवळ वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या किती जागा पडल्या यावरच चर्चा रंगली होती. त्यानंतर, विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्र्वादीने अनेक प्रस्ताव समोर ठेऊन देखील प्रकाश आंबेडकर आघाडीत सामील न होता, केवळ अवास्तव मागण्या करून ते चर्चेत राहिले. वंचित बहुजन आघाडी इतिहास रचनार असं काहीसं चित्र उभं करण्यात आलं.

परिणामी, काँग्रेस आघाडीला मदत करणारे आनंदराज आंबेडकर देखील वंचित बहुजन आघाडीत सामील झाले. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर वंचितला एकही जागा जिंकता आली नाही. इतकंच काय तर अकोल्यात देखील तेच चित्र पाहायला मिळालं. परिणामी, वंचित आघाडी केवळ भाजपाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करत असल्याचे आरोप होऊ लागले होते. निवडणुकीपूर्वीच वंचित’मधील इतर वरिष्ठ नेते देखील वंचितला सोडून गेले होते. मात्र त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी देखील वंचितला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीमुळे प्रकाश आंबेडकर यांची राजकीय हवाच निघून गेली आहे. त्यात जोगेंद्र कवाडे काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत असताना आणि रामदास आठवले सध्या भाजपमध्ये असून देखील शरद पवारांच्या घरी घिरट्या मारू लागले आहेत. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणामुळे वंचित राजकारणातून वंचितच राहणार असंच चित्र सध्या आहे, किंबहुना राहिलंच तर ते अकोला पुरतीच मर्यादित राहील असं चित्र आहे.

विशेष म्हणजे रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन कार्यक्रमात याबाबतची ते घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत होते. दादर येथील आंबेडकर भवनात रिपब्लिकन सेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार होता आणि वंचितमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा रिपब्लिकन सेनेत येण्यासाठी ते अवाहन करणार होते. आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी वंचितला सोडचिठ्ठी देण्याबाबतचा निर्णय घेणे हे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

Web Title:  Republican Sena President Anandraj Ambedkar criticize Vanchit Bahujan Aghadi and Prakash Ambedkar.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x