22 November 2024 5:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भाजप तोंडघशी; केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून JNU'ची स्तुती

JNU, UPSC IES Examination, Union HRD Minister Ramesh Pokhriyal Nishank

नवी दिल्ली: JNU’बाबत भाजपने नेहमीच आक्रमक भूमिका घेत अनेकांनी या विद्यापीठावर बंदी घालण्याची देखील भाषा केली आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना आणि केंद्रातील मंत्र्यांनी देखील जेएनयूमध्ये तुकडे तुकडे गँग सक्रिय असल्याचा आरोप वारंवार केला आहे. त्यात भारतीय जनता पक्ष आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच अग्रणी असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात केंद्र सरकार तर जेएनयूला’बाबत नेहमीच दुटप्पीपणानं वागत असल्याचा आरोप विरोधकांनी देखील अनेकवेळा केला आहे.

मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या (आयईएस) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेसाठी पात्र ठरलेले ३२ पैकी १८ विद्यार्थी एकट्या जेएनयूचे असल्यानं अतिशय आनंद झाल्याचं निशंक यांनी म्हटलं आहे. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात जेएनयू देशात कायमच अव्वल असल्याचं आपण आधीही म्हटलं होतं, असंदेखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनांवर उजव्या संघटना मोदी सरकारवर टीका करत असताना दुसऱ्या बाजूला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील अत्यंत खडतर आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या तसेच यूपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी केल्याचे समोर आलं आहे आणि त्यामुळे मोदी सरकार देखील तोंडघशी पडल्याचं म्हटलं जातं आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या (आयईएस) परीक्षेचा निकाल जाहीर झाले आहेत. सध्या हिंसाचार आणि आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या १८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवलं आहे. भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचाच बोलबोला पाहायला मिळाला आहे.

भारतीय अर्थशास्त्र सेवेत देशस्तरावर केवळ ३२ जागा असतात. यातल्या १८ जागा जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी पटकावल्या आहेत. यामुळे जेएनयूतल्या शिक्षणाचा दर्जा इतर विद्यापीठांपेक्षा उत्तम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ५ जानेवारीला जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली. यावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

Web Title:  JNU is our top University says Union HRD Minister after 18 students qualified in UPSC IES Examination.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x