22 November 2024 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

आंध्र प्रदेश: एक आमदार असलेल्या पवनकल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत भाजपची युती जाहीर

Janasena party, Pawan Kalyan, BJP Andhra Pradesh

हैदराबाद: महाराष्ट्रातील राजकरणात मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाची मनसेसोबत युती शक्य असल्याचं म्हटलं जातं. अगदी मनसेने हिंदुत्वाच्या मुद्याला अनुसरून राजकारण स्वीकारल्यास ते शक्य आहे. विशेष म्हणजे मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारून स्वतःला भाजपपासून वेगळं ठेवत स्वतःच हिंदुत्वाच राजकारण सुरु ठेवल्यास ही युती अधिक शक्य आहे अशी शक्यता आहे. भाजप-मनसे युतीचे पहिले प्रयोग कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नवी मुंबई या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केले जातील. त्यानंतर २०२४ मधील निवडणुकीची आखणी केली जाईल असं राजकीय विश्लेषक म्हणतात. एक आमदार असलेल्या आणि मोदी-शहांना टोकाचा विरोध करणाऱ्या पक्षासोबत ते कसं शक्य आहे असे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र हाच प्रयोग आंध्र प्रदेशात आज उदयास आला आहे. तेलगू देसम आणि वायएसआर काँग्रेस असे पक्ष यांच्यासमोर डाळ शिजणार नसल्याने भाजपने येथे मोदींचा आणि भाजपचा विरोध करणाऱ्या आणि केवळ आमदार असणाऱ्या पवनकल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत अधिकृतपणे युती जाहीर केली आहे.

तेलुगू चित्रपट इंडस्ट्रीजमधील अभिनेता आणि आंध्र प्रदेशमधील जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवनकल्याण यांनी भाजपसोबत आघाडी करणार असल्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा मिळविण्यासाठी आपण ही हातमिळवणी करत असल्याचं पवणकल्याण यांनी म्हटलंय. यापूर्वी पवणकल्याण यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती.

केंद्र सरकारने राज्याला विशेष दर्जा देण्याऐवजी विशेष पॅकेज दिलंय, हे सांगताना केंद्राने वास मारणारे लाडू खाऊ घातल्याचं पवणकल्याण यांनी म्हटलं होतं. मात्र, जर मोदी सरकार राज्याला विशेष दर्जा देण्यासाठी तयार असेल, तर आपण भारतीय जनता पक्षासोबत जाण्यास तयार असल्याचं पवणकल्याण यांनी म्हटलंय. भाजपा आणि जनसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी गुरुवारी विजयवाडा येथे बैठक झाली. या बैठकीला भाजपाकडून प्रभारी सुनिल दियाधर, कन्ना लक्ष्मीनारायण, जीवीएल नरसिम्हराव तर जनसेना पक्षाकडून पवणकल्याण आणि नांदेडला मनोहर उपस्थित होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पवणकल्याण यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. आंध्र प्रदेशमध्ये जनसेना पक्षाचा सध्या एकच आमदार आहे.

दरम्यान, दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि २०२४ मधील विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुका एकत्र लढतील. तेलगू चित्रपट अभिनेता पवन कल्याण म्हणाले की, मी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटलो आणि त्यांच्या ग्रीन सिग्नलनंतर आम्ही सुनील देवधर आणि इतरांशी भेट घेतली. आम्ही आंध्र प्रदेशच्या आणि लोकांच्या हितासाठी बिनशर्त आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. युती जातीवादी राजकारणाविरूद्ध लढा देईल आणि एक मजबूत पर्याय म्हणून उदयास येईल असा विश्वास व्यक्त केला.

यापूर्वी त्यांनी भाजपाला तीव्र विरोध करत टोकाची भूमिका घेतली आहे. राष्ट्रगीतासंदर्भात राजकीय पक्षांना आणि नेत्यांना प्रेम नाही का अशा आशयाचा प्रश्न पवन कल्याण यांनी उपस्थित केला होता. ‘राजकीय पक्ष त्यांच्या बैठकी सुरु करण्याआधी राष्ट्रगीत का वाजवत नाहीत? केवळ चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे बंधन का?, देशातील सर्वोच्च (सरकारी) कार्यालयांमध्येही राष्ट्रगीत वाजवले जावे. जे लोक आपल्यासाठी नियम आणि कायदे तयार करतात त्यांनीच ते अमलात आणून सामान्यांसमोर एक आदर्श निर्माण करावा,’ असं पवन कुल्याण म्हणाले होते.

 

Web Title:  Telugu Actor and President of Jana Sena party Pawan Kalyan made alliance with BJP in Andhra Pradesh.

हॅशटॅग्स

#AmitShah(14)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x