19 April 2025 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

महाराष्ट्र धर्म आणि भगव्या हिंदुत्वाची सांगड; मनसेचे शिवसेना भवनासमोर पोस्टर

MNS Mahaadhiveshan, HIndutva Agenda

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या झेंड्यात बदल करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होतं असताना त्याला मनसेत कोणीही जसे स्वीकारले तसेच नाकारले देखील नाही. मात्र भविष्यात भगवे बदल होणार याचे अप्रत्यक्ष संकेत मात्र दिले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलत्या राजकारणाला अनुसरून एकतर सेक्युलर भूमिका स्वीकारेल किंवा हिंदुत्वाची असे निरनिराळे अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहेत.

मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना देत असलेल्या संकेतावरून तरी मनसे भगव्या राजकारणाला सुरुवात करणार असंच सध्या चित्र आहे आणि त्याला अनुसरून मनसेकडून पोस्टरबाजी देखील सुरु झाली आहे. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच तयारी केली आहे. मुंबईत दादरमधील शिवसेना भवनासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो असलेलं भगवं पोस्टर लावण्यात आलं आहे.

त्यावर ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं या पोस्टरवर लिहिलं आहे. सेनाभवनासमोर गुरुवारी रात्री हे भव्य पोस्टर लावण्यात आलं. त्यानंतर, मराठी आणि हिंदुत्व यांची सांगड घालणाऱ्या ‘महाराष्ट्र धर्मा’वर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची राजकीय वाटचाल करणार असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

तत्पूर्वी महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेला राजकीय पेचात पडून त्याच्या भूमिकेमुळे दुरावलेला मतदार स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी मनसे सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या बातम्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जर-तर’च्या मुद्यावर प्रतिक्रिया देताना भविष्यातील युतीचे दिलेले संकेत बरंच काही सांगून गेले.

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं अधिवेशनात अधिकृत लाँचिंग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २३ जानेवारी ही तारीख निवडली आहे. त्यासोबतच पक्षाच्या झेंड्यातही बदल करत मनसे हिंदुत्वाचे राजकारण करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

 

Web Title:  MNS Chief Raj Thackeray saffron poster at Shivajipark near Shivsena Bhawan ahead of MNS Maha Adhiveshan.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या