24 November 2024 5:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

कट्टर राजकीय विरोधक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर

BJP Leader Pankaja Munde, Minister Dhananjay Munde

बीड: कट्टर राजकीय विरोधक असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले आहेत. गहिनीनाथ गडावरच्या एका कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले. एकमेकांवरच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं बीडची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली होती. विधानसभा निवडणुकीनंतर दोघे पहिल्यांदाच एकत्र आले. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांचा ४२ व्या पुण्यतिथी महोत्सव पार पडतोय. त्यानिमीत्ताने हे भाऊ-बहीण एकाच व्यासपीठावर दिसले.

गहिनीनाथ गडावर दरवर्षी भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे व्यासपीठावर असतात. तर, धनंजय मुंडे हे पहाटेची पूजा करुन जातात. परंतु, यावेळी नव्यानेच पालकमंत्री बनलेल्या धनंजय मुंडे यांचीही जाहीर कार्यक्रमात हजेरी पाहायला मिळली. विधानसभा निवडणुकांनं यावेळी धनंजय यांनी पंकजा यांचा दारुण परावभ केला. निवडणूक वैयक्तिक आरोपांनी राज्य भर गाजली होती.या पार्श्र्वभूमीवर मुंडे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर आले होते.

या पराभवानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर बहुप्रतीक्षीत स्वाभिमान दिनानिमित्त भाषण केले. मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर माहिती नाही. आता चेंडू भारतीय जनता पक्षाच्या कोर्टात आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. शिवाय पंकजा मुंडेंनी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीचं सदस्यत्व सोडत असल्याचं जाहीर केलं. पक्ष काढायचा की काय करयचं ते पुढे ठरवूच पण आता पक्षाने ठरवायचं आहे, असं म्हणत पंकजांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला होता.

विधानसभा निवडणूक प्रचारदरम्यान केज तालुक्यातील वीडा येथे प्रचारसभेदरम्यान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून दोघांतील संघर्ष वैयक्तिक पातळीवर आला.यामुळे परळीतील वातावरण चांगलेच तापलं होतं. भावणीक पातळीवरील आरोपानंतर या निवडणुकीत धनंजय यांनी पंकजा यांचा तब्बल बत्तीस हजार मतांच्या फरकाने दारुण पराभव केला. राज्यातही संत्तातर झाले आणि दोघांच्या भुमिकांचीही अदलाबदल झाली.

 

Web Title:  Beed BJP Leader Pankaja Munde and Minister Dhanjay Munde on same stage.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x