सरकारकडे पैशांची कमतरता नसून निर्णय घेण्याचीच हिंमत नाही: नितीन गडकरी
नागपूर: ‘देशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्ये निर्णय घेण्याचीच हिंमत नाही’, असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. विविध योजनांवर काम न होण्याची कारणे सरकारची मानसिकता आणि नकारात्मक दृष्टीकोन ही असल्याचेही गडकरी म्हणाले. ते नागपुरात विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे मोदी सरकारच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Live from Gram Vikas Sanstha’s – ‘Ek Pahal Abhinav Gaon ki Ore’ Program https://t.co/9al4XK0KKb
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 19, 2020
सरकारमध्ये निर्णय घेण्याती हिम्मत नाही, असे गंभीर विधानही यावेळी केंद्रीय मंत्री गडकरींनी या वेळी केले. ते पुढे म्हणाले की, ‘परवा मी एका उच्च स्तरीय बैठकीला गेले होतो. तिथे हे सुरू करणार…. ते सुरू करणार… असे ते आयएएस अधिकारी म्हणत होते. मी त्यांना म्हटले की, तुम्ही का सुरू करणार?… तुमची जर सुरू करण्याची हिम्मत असती, तर तुम्ही आयएएस अधिकारी बनून इथे नोकरी का करता?.’
पुढे गडकरी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की “महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे मेळावे उपयुक्त आहेत. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना. सूक्ष्म उद्योग खात्याचा मी मंत्री आहे माझ्याकडे मोठं बजेट आहे. तुम्ही उद्योगासाठी पुढे या आम्ही तुम्हाला मदत करू”, असा सल्ला सुद्धा गडकरी यांनी दिला. नागपूरच्या रेशीम बाग मैदानात महिला उद्योजिका मेळावा नागपूर महानगरपालिके तर्फे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला उद्योजकांनी भाग घेतला. वेगवेगळ्या प्रकारेचे छोटे छोटे उद्योग यात सहभागी झाले होते.
तत्पूर्वी, शहरातील दळणवळणासाठी स्काय बसचा प्रस्ताव ठेवला होता. ६०० कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता पीपीपी प्रकल्पाचा अवलंब करा, कारण सरकारकडे आता पैसे नाहीत. तेव्हा खासगी भागीदारी आणि सरकार यातून बीओटी आणि पीपीपी तत्त्वावरच या पुढे काम करावे लागणार आहे. कारण पैशाचे सोंग आणता येत नाही, असे सांगत औरंगाबाद शहरासाठी सूचविलेल्या ‘स्काय -बस’ साठी तोच मार्ग योग्य ठरेल, असे ते औरंगाबाद येथील ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या लघू उद्योजकांच्या ‘मासिआ’ संघटनेतर्फे आयोजित प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी म्हणाले होते.
Web Title: Union minister Nitin Gadkari says central government does not have the guts to take decisions.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार