22 November 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

सरकारकडे पैशांची कमतरता नसून निर्णय घेण्याचीच हिंमत नाही: नितीन गडकरी

Union Minister Nitin Gadkari, PM Narendra Modi

नागपूर: ‘देशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्ये निर्णय घेण्याचीच हिंमत नाही’, असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. विविध योजनांवर काम न होण्याची कारणे सरकारची मानसिकता आणि नकारात्मक दृष्टीकोन ही असल्याचेही गडकरी म्हणाले. ते नागपुरात विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे मोदी सरकारच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारमध्ये निर्णय घेण्याती हिम्मत नाही, असे गंभीर विधानही यावेळी केंद्रीय मंत्री गडकरींनी या वेळी केले. ते पुढे म्हणाले की, ‘परवा मी एका उच्च स्तरीय बैठकीला गेले होतो. तिथे हे सुरू करणार…. ते सुरू करणार… असे ते आयएएस अधिकारी म्हणत होते. मी त्यांना म्हटले की, तुम्ही का सुरू करणार?… तुमची जर सुरू करण्याची हिम्मत असती, तर तुम्ही आयएएस अधिकारी बनून इथे नोकरी का करता?.’

पुढे गडकरी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की “महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे मेळावे उपयुक्त आहेत. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना. सूक्ष्म उद्योग खात्याचा मी मंत्री आहे माझ्याकडे मोठं बजेट आहे. तुम्ही उद्योगासाठी पुढे या आम्ही तुम्हाला मदत करू”, असा सल्ला सुद्धा गडकरी यांनी दिला. नागपूरच्या रेशीम बाग मैदानात महिला उद्योजिका मेळावा नागपूर महानगरपालिके तर्फे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला उद्योजकांनी भाग घेतला. वेगवेगळ्या प्रकारेचे छोटे छोटे उद्योग यात सहभागी झाले होते.

तत्पूर्वी, शहरातील दळणवळणासाठी स्काय बसचा प्रस्ताव ठेवला होता. ६०० कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता पीपीपी प्रकल्पाचा अवलंब करा, कारण सरकारकडे आता पैसे नाहीत. तेव्हा खासगी भागीदारी आणि सरकार यातून बीओटी आणि पीपीपी तत्त्वावरच या पुढे काम करावे लागणार आहे. कारण पैशाचे सोंग आणता येत नाही, असे सांगत औरंगाबाद शहरासाठी सूचविलेल्या ‘स्काय -बस’ साठी तोच मार्ग योग्य ठरेल, असे ते औरंगाबाद येथील ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या लघू उद्योजकांच्या ‘मासिआ’ संघटनेतर्फे आयोजित प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी म्हणाले होते.

 

Web Title:  Union minister Nitin Gadkari says central government does not have the guts to take decisions.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x