22 November 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

मशिदीत पार पडला हिंदू विवाह, मुस्लीम समाजाचा पुढाकार आणि १० तोळं सोनं दिलं भेट

Hindu Marriage, Mosque, Kerala, Kerala Chief Minister Pinarai Vijayan, Muslim

अलप्पुझाः केरळमधील लोकांनी पुन्हा एकदा सामाजिक भान जपले आहे. रविवारी केरळच्या अलप्पुझामधील एका मशिदीत हिंदू जोडप्याचे रितीरिवाजानुसार लग्न पार पडले. या लग्न समारंभाला मुस्लिम आणि हिंदू समाजाचे लोक उपस्थित होते. या लग्न समारंभाचे आयोजन चेरूवली मुस्लिम जमात मशिदीने केले होते.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विवाह झालेल्या तरुणीचं नाव अंजू आहे. अंजूच्या वडिलांचा दोन वर्षापूर्वी ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. आई बिंदू यांच्यासमोर मुलीचं लग्न कसं करायचं याची चिंता लागली होती. पतीच्या निधनानंतर असहाय्य झालेल्या बिंदू आपल्या तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी मशिदीच्या व्यवस्थानकडे यासाठी मदत मागितली. यावर त्यांनी तात्काळ मदतीसाठी तयारी दर्शवली.

 

Web Title:  Hindu couple got married in Mosque in Kerala Chief Minister Pinarai Vijayan congratulates couple and terms it as example of unity.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x