22 April 2025 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मनसे अधिकृतने फेसबुक पेज'वरून झेंडा हटवला; हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकणार?

MNS Adhiveshan, MNS Adhikrut, MNS Adhikrut Facebook

मुंबई : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच झेंडा बदलणार आणि हिंदुत्वाच्या अजेंड्यावर वाटचाल करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. परंतु, आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडाबदलाच्या चर्चेने आणखीनच वेग पकडला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन येत्या २३ तारखेला मुंबईत होणार असून त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्या रूपात दिसणार असल्याचं वृत्त आहे. यावेळी तब्बल एक लाख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाचा नवा झेंडा जाहीर करणार आहेत असं म्हटलं जातं. मात्र या मेळाव्याचं नवं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलंय. पोस्टरवर भगव्या रंगात महाराष्ट्राचा नकाशा दाखविण्यात आला होता. आधिचा पंचरंगी झेंडा पोस्टरवरुन गायब झाला होता. राज ठाकरेंची महाराष्ट्रधर्माची भूमिका असणार असल्याचं स्पष्ट झालंय. सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना देत असलेल्या संकेतावरून तरी मनसे भगव्या राजकारणाला सुरुवात करणार असंच सध्या चित्र आहे आणि त्याला अनुसरून मनसेकडून पोस्टरबाजी देखील सुरु झाली आहे. अगदी २ दिवसांवर येऊन ठेपलेल्या मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच तयारी केली आहे. मुंबईत दादरमधील शिवसेना भवनासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो असलेलं भगवं पोस्टर लावण्यात आले होते.

तर ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असंही पोस्टर झळकला होता. सेनाभवनासमोर गुरुवारी रात्री हे भव्य पोस्टर लावण्यात आलं. त्यानंतर, मराठी आणि हिंदुत्व यांची सांगड घालणाऱ्या ‘महाराष्ट्र धर्मा’वर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची राजकीय वाटचाल करणार असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

तत्पूर्वी महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेला राजकीय पेचात पडून त्याच्या भूमिकेमुळे दुरावलेला मतदार स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी मनसे सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या बातम्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जर-तर’च्या मुद्यावर प्रतिक्रिया देताना भविष्यातील युतीचे दिलेले संकेत बरंच काही सांगून गेले.

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं अधिवेशनात अधिकृत लाँचिंग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २३ जानेवारी ही तारीख निवडली आहे. त्यासोबतच पक्षाच्या झेंड्यातही बदल करत मनसे हिंदुत्वाचे राजकारण करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

 

Web Title:  MNS Adhikrut remove old flag profile cover image before Adhiveshan.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या