22 November 2024 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

व्हिडिओवरून भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे: चंद्रकांत पाटील

BJP State President Chandrakant Patil, Chhatrapati Shivaji Maharaj, Tanhaji Movie

मुंबई: तान्हाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडिओ कोणीतरी पोलिटिकल कीडा नावाच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. भारतीय जनता पक्ष त्या व्हिडिओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भारतीय जनता पक्ष या व्हिडिओचा निषेध करत आहे. या व्हिडिओवरून भारतीय जनता पक्षाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे.

तानाजी चित्रपटाचा प्रोमो दाखवून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जागी अमित शहांचा चेहरा दाखवलेला एक VIDEO समाज माध्यमांवर चर्चेचा विषय झाला होता. यावर शिवसेना, काँग्रेस, एनसीपी’सह अनेकांनी आक्षेप घेतल्याने अखेर हा व्हिडिओ यु-ट्यूब’वरून हटवण्यात आला आहे. पॉलिटिकल किडा नावाच्या ट्विटर हँडलवर दिल्ली निवडणुकांचे वारे लक्षात घेत हा पॅरडी व्हिडिओ शेअर करण्यात आला. या पोस्टशी आपला संबंध नाही, असं म्हणज भारतीय जनता पक्षानेही हात झटकले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागतात त्यांना छत्रपतींच्या बाबतीत बोलायचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. ते एक अद्वितीय ऐतिहासिक राजे होते आणि असे कर्तबगार राजे पुन्हा होणे नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. सध्या होत असलेला विरोध पाहता, य़ू टुब ने तो विवादात्मक व्हिडीओ हटवला आहे.

 

Web Title:  Asking question over Mophed video of Tanhaji to BJP is wrong says BJP State President Chandrakant Patil.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x