21 April 2025 2:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

शिवरायांची शिवमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या भगव्या ध्वजाचं अनावरण

MNS New Flag, Hindutva, Raj Thackeray, Amit Thackeray

मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

अधिवेशन स्थळी चहापानापासून भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाची भूमिका अडचणीची ठरेल असा दावा केला जात आहे. याच गृहितकातून मनसेने हिंदुत्वाची कास धरत हिंदुत्ववादी शिवसैनिकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. मनसेने आपल्या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा असलेला झेंड्याचं अनावरण झालं आहे आणि त्यानंतर उपस्थित महाराष्ट्र सैनिकांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.

राज ठाकरे यांनी झेंड्याचं अनवारण करण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. तसंच आपण संध्याकाळी भाषण करणार असून त्यात सविस्तर बोलणार असल्याची माहिती दिली.

राज ठाकरे यांची मनसे सेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या स्थापनेवेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला मराठीचा मुद्दा हात घेतला होता. परंतु, कालांतरानं सेनेनं हिंदुत्वचा मुद्दा हाती घेत राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेतली. राज ठाकरे यांनाही मराठीच्या मुद्द्या हाती घेत मनसेची स्थापना केली. आता सेने प्रमाणेच मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या दिशेनं धावणार का? हे लवकरचं स्पष्ट होईल.

खरंतर मागील ७-८ वर्षांत मनसेला विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आला नाही. सतत पक्षाची पडझड होत गेली. राज्य पातळीवर पक्षबांधणीकडे दुर्लक्ष होत गेलं. ठोस कार्यक्रम नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ आली. मात्र, आता महाअधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, आज मनसेच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबत स्वातंत्रवीर सावरकर यांचा फोटो देखील ठेवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून देशभरात सावरकरांच्या नावाने मोठं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरून शिवसेना देखील कोंडीत सापडल्याचे पाहायला मिळले होते. विशेष म्हणजे काँग्रेसने तर सावरकरांना भारतरत्न दिल्यास आम्ही थेट सत्तेचा देखील त्याग करू, अशी टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेना राज्यात सावरकरांना भारतरत्न देण्यावरून भाजपच्या अजेंड्यावर गेल्यास राज्यात काँग्रेस कोणताही निर्णय घेऊ शकतं अशी शक्यता अधिक आहे.

मात्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून देशभरात राजकारण तापलं तरी मनसे अध्यक्ष पूर्वीपासूनच स्वातंत्रवीर सावरकरांची उदाहरणं सभेतील भाषणात मांडण्यात आली आहेत. त्यामुळे स्वातंत्रवीर सावरकरांच्या प्रत्येक जयंतीला त्यांच्या फेसबुक अधिकृत पेजवरून अभिवादन करत आले आहेत. वाचनाची प्रचंड आवड असल्याने राज यांनी स्वतः स्वातंत्रवीर सावरकरांची पुस्तकं वाचली आहेत आणि त्यामुळे त्यावर देखील आज विचार मांडतील अशी शक्यता आहे असं आजच्या व्यासपीठावरील फोटोवरून दिसत आहे.

 

Web Title:  MNS Party has launched a new flag of the party.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या