माझं CAA'ला समर्थन नाही; मोर्चा घुसखोर पाकिस्तानी-बांगलादेशीं विरोधात: राज ठाकरे
मुंबई: राज ठाकरे यांनी आज सीएए’बाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या देशात सीएए-एनआरसीविरोधात निघणाऱ्या मोर्चांविरोधात आपण मोर्चा काढणार, मोर्चाला मोर्चानं उत्तर देणार अशी भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली होती. यानंतर आता राज यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. माझं सीएएला समर्थन नाही. मनसेचा ९ फेब्रुवारीला निघणारा मोर्चा कायद्याच्या समर्थनार्थ नसेल, तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चांविरोधात असेल, असं म्हणत राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना काल दिली होती. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल आयोजित करण्यात आली होती. रंगशारदा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मात्र राज ठाकरे १० मिनिटांतच बैठकीतून निघून गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने ते बैठकीतून निघून गेल्याचं सांगण्यात येत आलं.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला अनुसरून पक्षाच्यावतीने एक कणखर भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. परंतु त्यावरुन मनसेच्या नेत्यांमध्येच मतमतांतरं असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राज ठाकरे आज सलग दुसऱ्या दिवशी नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं वृत्त होतं. राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी सकाळी १० वाजता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. एनआरसीला पाठिंबा देण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ आहे. त्यासंदर्भातच ही बैठक असून पदाधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली होती.
या मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहात आहोत, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. काळाच्या बैठकी दरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते आशीष शेलार उपस्थित झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आपण वैयक्तिक कारणासाठी आलो होतो, असे शेलार यांनी पत्रकारांना सांगितले.
Web Title: MNS Chief Raj Thackeray clear party stand over CAA and Morcha organised on Nine February in Mumbai.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Vodafone Idea Share Price | पेनी शेअर प्राईस 55% घसरली, आता तेजीचे संकेत, ICICI ब्रोकरेज बुलिश - NSE: IDEA