24 November 2024 3:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

पवार पंतप्रधान व्हावेत; २ वर्षांपूर्वी जे बाळा नांदगावकर बोलले ते राऊत आज बोलले

Shivsena MP Sanjay Raut, Sharad Pawar

नाशिक: महाराष्ट्र हा परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. महाविकास आघाडीचा पॅटर्न हा देशातील परिवर्तनाची नांदी आहे. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ खासदार याच विचाराचे निवडून यायला हवेत. आगामी लोकसभा निवडणुकीत २०२४ ला हे परिणाम दिसतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना नगरसेवक, नाशिक महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते हे अध्यक्ष असलेल्या ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवारी, 25 जानेवारी रोजी नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात ‘आमने सामने’ ही शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. पत्रकार, प्रसिद्ध मुलाखतकार राजू परुळेकर यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी विविध प्रश्नांना राऊत यांनी उत्तरे दिली.

दरम्यान, साधारण दोन वर्षांपूर्वी बाळा नांदगावकर पुढे म्हणाले होते की, जर भविष्यात एक मराठी अनुभवी राजकारणी पंतप्रधानपदी विराजमान होणार असेल तर मनसे पक्ष नेहमीच शरद पवारसाहेबांच्या पाठीशी एक मराठी माणूस म्हणून नेहमीच ठाम पणे उभा राहील. बाळा नांदगावकर सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कऱ्हाड मधील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं होतं.

त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जर पंतप्रधान झाले तरी उत्तमच होईल,भारताचा पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, अशी सर्वांची ज्याप्रमाणे इच्छा आहे तशी मनसेचीही आहे असं ते म्हणाले होते. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर मुलाखत घेण्यामागे काही राजकारण असल्याच्या चर्चा केल्या जाऊ लागल्या. मात्र, मुलाखतीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यावेळी दिलं होतं.

 

Web Title:  Stand by Sharad Pawar to become A Prime Minister says MP Sanjay Raut.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x