22 November 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

शर्जीलला हवा इस्लामी भारत; पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर

JNU, Sharjeels

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)च्या विरोधात निदर्शनं करताना चिथावणीखोर भाषण करणारा ‘जेएनयू’चा विद्यार्थी शर्जील इमाम याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढं आली आहे. ‘शर्जील हा कट्टरतावादी विचारसरणीकडं झुकलेला असून भारत इस्लामी राष्ट्र व्हावं असं मानणाऱ्यांपैकी आहे,’ अशी कबुली त्यानं पोलिसांना दिल्याचं सूत्रांकडून समजतं.

सध्या शरजील इमाम पोलिसांच्या रिमांडमध्ये आहे. अनेक कट्टरपंथीच्या प्रभावाखाली शरजील असल्याने त्याला अटक झाल्याचा कोणताही पश्चाताप नाही असं पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार शरजील इमाम हा धर्मासाठी कट्टर आहे. त्याला भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचं आहे. तसेच त्याचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात कुठेही छेडछाड करण्यात आली नाही हे त्याने कबूल केलं आहे. सध्या त्याच्या व्हिडीओची तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये केली जात आहे.

शरजीलचा मित्र इम्रानला ताब्यात घेण्यात आले असता चौकशी केली तेव्हा शरजीलच्या प्रेयसीची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तिला गाठून तिच्यावर दबाव निर्माण केला आणि शरजीलला भेटण्यासाठी तिला सांगितलं. शरजील आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी तिला भेटायला जाताच पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईत स्थानिक पोलिसही दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकासमवेत होते. शरजील इमामला अटक करणार्‍या पोलीस पथकाचे प्रमुख दिल्ली पोलिसांचे डीसीपी गुन्हे शाखा राजेश देव होते.

पोलिसांनी पहाटे ४ वाजता मुझम्मिलच्या घरावर छापा घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतरच शारजीलचा थांगपत्ता लागल्याचे सांगण्यात आले. परंतु, शारजील स्वत: दिल्ली पोलिसांपुढे शरण आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, शरजीलला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

 

Web Title:  India should be Islamic Country Sharjeels investigation reveals shocking information.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x