22 November 2024 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

भारत हा हिंदू देश नाही; राजनाथ सिंह आणि मोहन भागवतांमध्ये दुमत? संघ कोपणार?

India is not a Hindu Nation, Rajnath Singh

नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनाचं रान पेटलं आहे. अशातच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. जर एखादा मुस्लीम पाकिस्तानातून आला तर त्याला नागरिकत्व दिले जाईल. यासाठी कायद्यात तरतूददेखील आहे असं ते म्हणाले.

एकीकडे देशभर सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे रान पेटलेलं असताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. एका बाजूला दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे हिंदू-मुस्लिम असा चालवला आहे आणि त्यात पाकिस्तान आणि देशद्रोह यांचा वारंवार भाषणात उच्चार केला जातं असल्याचं दिसतं.

पाकिस्तान सारख्या देशात नाकारलेले आणि त्यांच्या अत्याचारांचे बळी गेलेल्या हिंदूंना भारतात नागरिकत्व देण्यावरून अजून रणकंदन पेटलेलं असताना, भारतातील मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून स्वतःला असुरक्षित असल्याचं सांगत आहे. त्यात पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या मूळच्या पाकिस्तानी मुस्लिमांना भारत सरकार’मधील मंत्री थेट भारतात नागरिकत्व देण्याची भाषा करत असल्याने समाज माध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

पुढे राजनाथ सिंह असे म्हणाले की, ‘भारत हा हिंदू देश नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे कोणावरही धार्मिक अत्याचार होऊ शकत नाही. पाकिस्तानमध्ये बिगर मुस्लीम लोकांवर धार्मिक अत्याचार होतात, म्हणून आम्हाला हा कायदा करण्याची आवश्यकता होती. मग ते हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन आणि पारशी असतील, तिथे त्यांच्यावर धार्मिक अत्याचार केले जात आहे आणि भारतात त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची इच्छा आहे. मग आपण त्यांना नागरिकत्व देऊ. या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

तत्पूर्वी, नोव्हेंबर २०१९ मध्ये एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोणत्याही एका विचारधारेत बांधलं जाऊ शकत नाही. भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही, असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं होतं. ‘द आरएसएस : रोडमॅप फॉर ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. सदर पुस्तक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील आंबेकर यांनी लिहिलं आहे.

“संघाची विचारसरणी म्हणून काहीही बोलणं किंवा एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं चुकीचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनीही आपल्याला संघ पूर्णपणे समजला आहे, असं कधीही म्हटलं नाही. इतके दिवस सरसंघचालक राहिल्यानंतर गुरुजी म्हणाले की मला कदाचित संघ समजण्यास सुरुवात झाली असेल,” असंही त्यांनी नमूद केलं होतं.

 

Web Title:  India is not Hindu nation but it is a Secular nation says Defence Minister Rajnath Singh.

हॅशटॅग्स

#RajnathSingh(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x