22 November 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

नागरिकत्व कायद्यात सुधारणा म्हणजे गांधींजींची स्वप्नपूर्ती : राष्ट्रपती

President of India Ramnath Kovind, Citizenship Amendment Act 2019, CAA

नवी दिल्ली: २०२० च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संयुक्तरित्या संबोधित केले. याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सितारमण आर्थिक सर्वेक्षण सुद्धा सादर करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे २०२० चे पहिले अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. दशकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करणे हे आम्हा सर्वांचे प्रयत्न राहील असेही पंतप्रधान म्हणाले आहेत. सोबतच, या अर्थसंकल्पात सामान्य लोकांच्या सशक्तिकरणावर सार्थक चर्चा व्हावी असेही ते पुढे म्हणाले.

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराचा मी निषेध करतो आणि जागतिक समुदायाने याकडे लक्ष देऊन या दिशेने आवश्यक पावले उचलण्याची विनंती करतो. तसंच माझे सरकार हे पुन्हा स्पष्ट करु इच्छिते की, भारतावर आस्था ठेवणारे आणि भारताची नागरिकता घेऊ इच्छितात, त्या जगातील सर्व पंथीयांसाठी जी प्रक्रिया आधी होती, तीच आजही कायम आहे, असं राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं.

रामनाथ कोविंद यांनी यावेळी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणं हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलं. यामुळे काश्मीर विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडला गेला असल्याचं त्यांनी सांगितलं. “३७० कलम आणि ३५ हटवलं जाणं फक्त ऐतिहासिक नाही तर यामुळे त्यांच्या विकासाची दारं खुली झाली आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाखचा विकास, तेथील संस्कृती आणि परंपरेचं रक्षण, पारदर्शी कारभार करणं माझ्या सरकारची प्राथमिकता आहे,” असं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं.

 

Web Title:  Brief in central hall as President of India Ramnath Kovind speaks on the Citizenship Amendment Act 2019.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x