21 November 2024 11:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

३ महिन्यातच उद्धव ठाकरे सुट्टीवर; काय मोठा पराक्रम केला म्हणून सुट्टी? - निलेश राणे

CM Uddhav Thackeray, Mahabaleshwar Holiday, Former MP Nilesh Rane

मुंबई:  मिनी काश्मीर म्हणुन ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री उद्भव ठाकरे हे तीन दिवसाच्या खाजगी दौर्‍यावर जातायेत. त्यासाठी महाबळेश्वर मधील वेण्णा लेक परिसरात हॅलिपॅड बनविण्यात आले असुन मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर मध्ये फ्लेक्स लावण्यात आले असून स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री ३ दिवस सहकुटुंब महाबळेश्वर येथील राजभवन येथे वास्तव्य करणार आहेत. या दरम्यान महाबळेश्वर येथील एका लग्नसोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुट्यांच्या निमित्ताने महाबळेश्वर दौऱ्यावर असल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली असून पोलीस प्रशासन, पालिका, महसूल, बांधकाम विभागासह सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. मुख्यमंत्री ६ आसनी हेलिकॉप्टरने येणार असल्याने हे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागा शोधण्याची कसरत स्थानिक प्रशासनाला करावी लागली. वनविभागाकडून मागील अनेक वर्षापासून पोलो मैदानावर हेलिकॉप्टर उतरण्यास बंदी केल्याने जागेची मोठी अडचण झाली. बुधवारी सायंकाळी वेण्णालेक येथील पठारासह महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर असलेल्या वेलोसिटीमधीलही जागेची पाहणी करण्यात आली. अखेर वेण्णालेक पठारावर हेलिकॉप्टर उतरण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

आज सुरक्षेसाठी जिल्हयाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर एक महत्वाची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आढावा घेण्यात आला. यावेळी उपअधिक्षक अजित टिके प्रांताधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, पोलीस निरीक्षक बी ए कोंडुभैरी आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मात्र सरकार स्थापन होऊन ३ महिने सुद्धा झालेले नसताना मुख्यमंत्री सहकुटुंब सुट्यांवर गेल्याने विरोधकांनी निशाणा साधला आहे. यावर माजी खासदार निलेश राणे ट्विट करत म्हटलं आहे की, ‘मी १९९५ पासून ते २०१९ पर्यंत ६ मुख्यमंत्री बघितले पण त्या पदावर असताना त्यांनी सुट्टी घेतलेली आठवत नाही. जवळपास ३ महिने झाले आणि उद्धव ठाकरे ३ दिवस सुट्टीवर. काय मोठा पराक्रम केला ह्या तीन महिन्यात की ह्यांना सुट्टी घ्यावी लागली. झेपत नसेल तर खुर्ची खाली करा’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

 

Web Title:  Former MP Nilesh Rane target CM Uddhav Thackeray holiday at Mahabaleshwar.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x