22 November 2024 9:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

राम कदम यांच्या नंतर बबनराव लोणीकरांकडून महिला वर्गाचा अपमान

Former Minister Babanrao Lonikar, Tahasildar

जालना: माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बबनराव लोणीकर महिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. दरम्यान, लोणीकर यांनी केलेल्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान हवे असेल तर त्यांनी मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा काढायला हवा. तरच राज्यातील सरकार त्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान देईल. या मोर्चासाठी मी कुणाला आणू हे तुम्ही सांगा. देवेंद्र फडणवीस यांना आणू का?, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू का?, की एखादी हिरोईन आणू?, हे मला तुम्हीच सांगा. जर एखादी हिरोईन मिळाली नाही तर आपल्या स्टेजवर बसलेल्या तहसिलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्याही हिरोईन सारख्याच दिसतात, असे लज्जास्पद विधान बबनराव लोणीकर यांनी केले आहे. स्टेजवर त्यांचा मुलगा व जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर, तहसिलदार मॅडम, सरपंच बसलेले होते. लोणीकर यांच्या या वक्तव्यानंतर तहसिलदार मॅडम स्टेजवरून उठून गेल्या. परंतु, लोणीकर यांना याविषयी काहीच वादग्रस्त वाटले नाही. मी जे काही बोललो त्यात काहीच वावगं नाही, असे लोणीकर म्हणत आहेत.

लोणीकरांच्या या विधानावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लोणीकरांच्या या वक्तव्याचा महिला संघटनांनी निषेध केलाय. राष्ट्रवादीनं लोणीकर यांच्या विधानाचा निषेध केला आहे. “बबनराव लोणीकरांचं वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते. भारतीय जनता पक्षाची संस्कृती रसातळाला गेली आहे. महिला अधिकाऱ्याचा सन्मान करणं आवश्यक आहे. एका महिलेबाबत असं वक्तव्य करणं विनयभंगाचा गुन्हा आहे,” असं राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनीही लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषध केला आहे.

तसेच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी बबनराव लोणीकर यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. वर्षा देशपांडे म्हणाल्या, “बबनराव लोणीकर कुठल्याही पदावर निवडून आले असले आणि कोणत्याही पक्षाचे असले, तरी यांच्यातील पुरुषी प्रवृत्ती, बाईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदल नाही हाच याचा अर्थ आहे. त्यांनी लोकांना गोळा करण्यासाठी हे वक्तव्य केलं आहे. लोकांना जमा करण्यासाठी हिरोईन आणणे आणि त्यासाठी एका गॅझेटेड अधिकाऱ्याचा असा उल्लेख करणं हे निषेधार्ह आहे.”

 

Web Title:  Controversial statement by BJP leader and Former Minister Babanrao Lonikar.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x