22 November 2024 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

मुंबईकरांना 24×7 तास पाणी देऊ अशी 'फेंकम फाक' करत 24×7 बार उघडे: आशिष शेलार

MLA Ashish Shelar, CM Uddhav Thackeray

मुंबई : वांद्रे ते जोगेश्वरी विभागात मागील ३ दिवस पाणी नसल्यामुळे तेथील रहिवाशांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. मेट्रोच्या कामामुळे वांद्रे ते जोगेश्वरी विभागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे येथे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे असूनही अजून पालिकेने याची दखल घेतली नसून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पाणी नसल्याने लोकांनी थेट बिस्लरी बॉटलचे पाणी कपडे, भांडी आणि आंघोळीसाठी विकत घेतलं आहे.

शेलार यांनी मुंबईकरांना २४×७ तास पाणी देऊ अशी “फेंकम फाक” करणाऱ्यांनी २४×७ बार उघडे केल्याचं म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘मुंबईकरांना २४×७ तास पाणी देऊ अशी “फेंकम फाक” करणाऱ्यांनी २४×७ बार उघडे केले. मागील ३ दिवस मात्र मुंबईकर पाण्यावाचून तडफडत राहिले. भल्यामोठ्या देशाच्या अर्थसंकल्पावर यांनी बोलण्यात काय अर्थ! ऐवढी वर्षे मुंबईकरांसोबत अशी “ही बनवाबनवी” सुरू आहे. हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!’ असं ट्वीटमध्ये शेलार यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. आय.डी.बी.आय आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचे खाजगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतात. काही शासकीय बॉण्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला गेला आहे, तो ही काळजी वाढवणारा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.

 

Web Title:  This are the thugs of Mumbai BJP MLA Ashish Shelar has criticized CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x