22 November 2024 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

माणसाकडे माणूस म्हणून न पाहता ‘वस्तू’ म्हणून बघितलं जाऊ लागल्याने ते घडतं आहे

MNS Chief Raj Thackeray, Hinganghat attempt to burned the professor

वर्धा: नंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्‍कादायक घटना काल घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती, ती काल नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले आणि त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.

त्यानंतर एकतर्फी प्रेमातून एका तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याच्या धक्कादायक घटनेनंतर हिंगणघाट शहरात जनआक्रोश गगनाला भिडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अवघे हिंगणघाट शहरच निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसले. गुन्हेगाराला ताबडतोब फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीचे फलक घेऊन विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पुरुष, कामगार, डॉक्टर्स, वकील, व्यापारी वर्ग व अन्य संघटनांनी मोर्चा काढला.

तत्पूर्वी, जेथे ही घटना घडली त्या नंदोरी चौकातून निघून हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे गेला. या मोर्चाला गावातल्या लहान लहान भागातून निघालेले छोटे मोर्चे सामील होताना दिसत होते. येथे मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आरोपीला जाळून टाका, न्याय द्या, सुरक्षा हवी अशा आशयाचे फलक व घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. समुद्रपूरमध्येही अशाच प्रकारचा मोठा मोर्चा काढण्यात आला.

तिला रुग्णालयात दाखल केलं. ही तरुणी ४० टक्के भाजली आहे. तिची वाचा गेली आहे. श्वास घेण्यासही तिला त्रास होतो आहे. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तिला नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची दृष्टीही जाण्याची भीती आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दरम्यान, मनसेने एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये घडलेली घटना मन हादरवून टाकणारी असल्याचे म्हटलं आहे. “एका शिक्षक महिलेला एका विवाहित तरुणाने पेटवून दिलं. मन हादरवून टाकणारी ही घटना आहे. ह्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध नोंदवत आहे. त्या आरोपीवर जबर कारवाई व्हायलाच हवी. कुठल्याही घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होत रहायला हवी तरच कायद्याचं राज्य स्थापित होईल, “बाजारीकरणाच्या काळात प्रत्येक गोष्ट ‘वस्तू’ म्हणून बघितली जाऊ लागली आहे. त्या ओघात माणसाकडे पण माणूस म्हणून न पाहता ‘वस्तू’ म्हणून बघितलं जाऊ लागलं की जे घडतं ते वर्ध्यात घडलं,” असं मनसेनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Web Title:  MNS Chief Raj Thakrays reaction on attempt to burned the professor in Wardha Hinganghat.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x