25 November 2024 9:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

भाजप नगरसेवक मुरजी पटेलांचं नगरसेवक पद लघुवाद न्यायालयाकडून रद्द

BJP corporator Murji Patel, Court

मुंबई:  मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकनं वाढली आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८१ मधून विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुरजी पटेल यांचं नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा आज लघुवाद न्यायालयात न्यायमूर्ती स्वर्णिता महालेंनी केली. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या संदीप नाईक यांचा नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा झाला. एकाच आठवड्यात शिवसेनेचं महापालिकेतलं संख्याबळ दोननं वाढलं आहे.

शिवसेनेचे अंधेरी पूर्वेकडील आमदार रमेश लटके याच मतदासंघातील विद्यमान आमदार आहेत आणि युती झाल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यानंतर भाजपाचे नगरसेवक मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. मात्र जवळपास ४० हजाराच्या घरात मतं घेऊन त्यांनी शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांचा मार्ग कठीण केला होता.

तत्पूर्वी, जातीच्या दाखल्याअभावी पालिकेतील एकूण ५ नगरसेवकांवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत त्यांचे नगरसेवक पद रद्द केलं होतं. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांचे खंडपीठ निकाल जाहीर केला होता. त्यामुळे इतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना ३, कॉंग्रेस १ आणि समाजवादी पक्षाच्या १ उमेदवारांना नगरसेवकपदाची मोठी लॉटरी लागली होती.

मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक ६७ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुधा सिंग, प्रभाग क्रमांक ७६ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक ८१ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक ९० मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने यापूर्वीच फेटाळले होते.

 

Web Title:  BJP corporator Murji Patel post is canceled by court today.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x