22 November 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापतीची धारदार शस्त्राने हत्या

Sangli Kawthemahakal, NCP leader Manohar Patil Murder

कवठेमहांकाळ: सांगली जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या खुनाचं सत्र सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या एका हत्येचा उलगडा होत नाहीत तोच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची हत्या झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते. देशींग इथं अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. राजकीय वैमनस्यातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोहर पाटील यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी मिरज येथील मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण ३ संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे रहिवाशी होते. या गावचे ते उपसरपंच राहिले होते. २०१७ मध्ये पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि ते विजयी देखील झाले होते. कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती पदही त्यांनी भूषवलं होतं. सध्या मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याचे संचालक होते. विशेष म्हणजे ४ दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. आनंदराव पाटील यांच्या डोक्यात वार करून हल्लोखोर पसार झाले होते.

 

Web Title:  NCP leader Manohar Patil Murder in Sangli Kawthemahakal.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x