22 April 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

युवासेना जिल्हा प्रमुखाच्या कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अज्ञाताकडून गैरवर्तन; तक्रार दाखल

Sakinaka Police Station, Marathi Actrees, Yuvasena, Shivsena

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील डान्सिंग क्वीन म्हणूनपरिचित असलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याचं संतापजनक वृत्त आहे. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.

संबंधित मराठी अभिनेत्री गुरुवारी ५ फेब्रुवारी रोजी पुण्यातील शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव इथं एका कार्यक्रमात नृत्य कलेचं सादरीकरण करण्यासाठी पोहोचली होती. युवासेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संबंधित कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, याच कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत संतापजनक गैरवर्तन केलं असल्याचं तिने आपल्या पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती पुढे आहे. ती मराठी अभिनेत्री मानसी नाईक असून युवासेनेच्या कार्यक्रमात एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरकृत्य केलं. त्याने मंचाजवळ जाऊन मानसीला धमकवण्याचा प्रयत्न देखील केला, असा आरोप मानसीकडून तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने प्रचाराला बोलावले आणि असभ्य वर्तन केल्याचं सांगत मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे’ने शिवसेनेचे राजुरा विधानसभा संपर्क प्रमुख मिथुन खोपडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

 

Web Title:  Birthday Party abusiveness Marathi actress at Pune shirur and complaint logged at Mumbai Sakinaka Police Station.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या