21 November 2024 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

नेरुळमधील सीहोम्स इमारतीला भीषण आग, ७ जवान जखमी

Navi Mumbai Fire in Seawoods

नवी मुंबई: काळचौकी परिसरातील एका इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग लागल्याची घटना ताजी असताना, नवी मुंबईतही एका टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईत नेरुळच्या सीवूड सेक्टर ४४ मध्ये एका टॉवरमध्ये शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास आग भडकली होती. त्यांना उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेरुळमधील सीवूड्स सेक्टर ४४ मधील सी होम्स या इमारतीच्या १८ व्या आणि १९ मजल्यावर आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एकूण ६ गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या. परंतु, ही आग मोठी असल्याने ती विझवणे जिकिरीचे धाले होते. इमारत गगनचुंबी असल्याने ही आग वेगाने पसरत होती. उंचीवरील आग विझवताना अनेक अडथळे येत असल्याने यात शर्थीचे प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे ७ जवान जखमी झाले. अखेर ३ तासांनंतर, म्हणजेच १०.३० वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली.

अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ५० ते ६० जवान घटनास्थळी अजून तळ ठोकून आहे. छुटपूट आग विझवण्याचे काम अद्यापही सुरू आहे. सकाळी ही आग लागली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रहिवाशांना इमारतीतून खाली आणण्यात आले आहे.

 

Web Title: Fire in high rise building in Seawoods of Navi Mumbai city 7 Fire fighter Jawans of Fire Brigade got Injured.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x