छेडछाड निंदनीय पण मानसी नाईकने युवासेनेच्या कार्यकर्त्यांचे नाव घेतले नाही: वरुण सरदेसाई
मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील डान्सिंग क्वीन म्हणूनपरिचित असलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त पसरलं.
संबंधित मराठी अभिनेत्री गुरुवारी ५ फेब्रुवारी रोजी पुण्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव इथं एका कार्यक्रमात नृत्य कलेचं सादरीकरण करण्यासाठी पोहोचली होती. युवासेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संबंधित कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, याच कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत संतापजनक गैरवर्तन केलं असल्याचं तिने आपल्या पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती पुढे आहे.
ती मराठी अभिनेत्री मानसी नाईक असून युवासेनेच्या कार्यक्रमात एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरकृत्य केलं. त्याने मंचाजवळ जाऊन मानसीला धमकवण्याचा प्रयत्न देखील केला, असा आरोप मानसीकडून तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने प्रचाराला बोलावले आणि असभ्य वर्तन केल्याचं सांगत मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे’ने शिवसेनेचे राजुरा विधानसभा संपर्क प्रमुख मिथुन खोपडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
मात्र मानसी नाईकच्या प्रकरणी युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी एक ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘अभिनेत्री मानसी नाईक यांच्या सोबत घडलेले छेडछाडीचे प्रकरण निंदनीय आहेच पण मानसी नाईक यांनी कोठेही युवासेनेचे अथवा युवासेना कार्यकर्त्यांचे छेडछाड प्रकरणात अथवा धमकी प्रकरणात नाव घेतले नाही….कृपया नोंद घ्यावी’ असं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र त्यांच्या स्पष्टीकरणावरून त्यांना विषय पूर्ण समजला नसल्याचंच म्हणावा लागेल आणि म्हणून त्यांनी तर्कहीन स्पष्टीकरण दिलं आहे.
अभिनेत्री मानसी नाईक यांच्या सोबत घडलेले छेडछाडीचे प्रकरण निंदनीय आहेच पण मानसी नाईक यांनी कोठेही युवासेनेचे अथवा युवासेना कार्यकर्त्यांचे छेडछाड प्रकरणात अथवा धमकी प्रकरणात नाव घेतले नाही.
कृपया नोंद घ्यावी.— Varun Sardesai (@SardesaiVarun) February 7, 2020
वास्तविक तो कार्यक्रम युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केल्याने विशेष निमंत्रकांची संपूर्ण त्यांची म्हणजे आयोजकांची होती. तसेच मानसी नाईक यांनी केलेल्या तक्रारीत त्याच गर्दीतील एकाने तिच्या सोबत असभ्य वर्तन केले आणि धमकी सुद्धा दिली. आता गर्दीतून आलेल्या एखाद्या व्यक्तीचे नाव तिला कसं ठाऊक असणार असा साधा प्रश्न वरून सरदेसाई यांना पडला नसावा असंच म्हणावं लागेल. युवासेनेच्या कार्यक्रमातील ती व्यक्ती कोण होती ते पोलीस शोधून काढतील, अन्यथा युवा सेनेच्या आयोजकांनी त्या व्यक्तीला समोर आणावं असे प्रश उपस्थित केले जाऊ शकतात.
Web Title: Yuvasena Leader Varun Sardesai given clarification on Marathi Actress Manasi Naik allegations.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News