22 November 2024 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

विठ्ठल माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही: शरद पवार

Sharad Pawar, Indrayani River, Vitthal Mandir, Warkari

आळंदी: ‘विठ्ठलाच्या, माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. तसं कुणाला वाटत असेल आणि कुणी परवानगी नाकारण्याची भाषा करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाचा विचार समजलाच नाही. तो सच्चा वारकरीच नाही,’ असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वारकरी परिषदेला हाणला.

वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी एक पत्रक जारी केलं होत. यामध्ये त्यांनी शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला. ‘पवार हे हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये; अशा आशयाचं पत्रक महाराजांनी जारी केलं होतं, यावर शरद पवार यांनी आज भाष्य केले.

दरम्यान इंद्रायणी शुद्धीसाठी पाठबंधारे विभागाकडे जावं लागणार आहे. त्यासाठी पाठबंधारे मंत्री जयंत पाटील यांना सांगू. त्याचवेळी पुण्याचे पालकमंत्री यांची जबाबदारी अधिक आहे. ही समस्या त्यांच्या कानावर टाकू, ते काय म्हणतात पाहू. तुमच्या सांगण्यावरून मी उपमुख्यमंत्र्यांशी बोलेल अशी कोपरखळी पवारांनी लागवली. तसेच पुढील ८ ते १० दिवसांत तुम्ही मुंबईला माझ्याकडे या, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री, पाठबंधारे मंत्री सर्वांना एकत्र करून हा प्रश्न सोडवू, असा शब्द शरद पवारांनी उपस्थितांना दिला.

हभप कोण आहे. हे मला माहीत नाही. वारकऱ्यांचे नेते असतात, हे मला माहीत नाही. कर्मकांडाला खुले आव्हान देणारी वारकरी सांप्रदाय होता. आता हे कोण आले आहेत. जात व्यवस्था तोडण्यासाठी ही वारकरी चळवळ आहेय. वारकरी हिंदू असला पाहिजे हे कोणी सांगितलं. सर्व जाती धर्माचे संत का निर्माण झाले, याचा आपला अभ्यास करायला पाहिजे. अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी वारकरी परिषदेवर टीका केली आहे.

 

Web Title:  Rndrayani river will be clean NCP President Sharad Pawar himself took responsibility.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x