23 December 2024 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch
x

भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध ठरत नाही: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

RSS, Bhaiyyaji Joshi, Hindu community does not mean BJP

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदू समाज नाही आणि भारतीय जनता पक्षाला विरोध करणं, म्हणजे हिंदूंना विरोध करणं नाही, असं वक्तव्य संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. राजकीय लढाई सुरुच राहणार आहे, त्याला हिंदूंशी जोडू नका, असंही भैय्याजी जोशी बोलताना म्हणाले आहेत. गोव्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सीएए, एनआरसीवरून देशात दोन गट पडल्याचं चित्र आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून भारतीय जनता पक्षाला विरोध केला जात आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यावर भूमिका मांडली असून, “हिंदू समाज म्हणजे भारतीय जनता पक्ष नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नाही,” असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी मांडले आहे. भय्याजी जोशी म्हणाले, भारतात काम करू इच्छिणाऱ्यांनी हिंदूसोबत त्यांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे. भारताला हिंदू समाजापासून वेगळ करून पाहता येणार नाही. हिंदू सदैव या देशाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज केवळ हिंदूमुळेच जिवंत आहे.

हिंदू हा हिंदू समाजाचा शत्रू होत आहे, म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा शत्रू होत आहे. हिंदू समुदायाचा अर्थ भारतीय जनता पक्ष नाही. विशेष म्हणजे भैय्याजी जोशींचं हे विधान नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)ला विरोध होत असताना आल्यानं त्याल महत्त्व प्राप्त झालं आहे. एक हिंदू आपल्या हिंदू भावाविरोधात लढतो कारण तो त्यावेळी धर्म विसरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपल्या कुटुंबीयांचा विरोध सहन करावा लागला होता. जिथे गोंधळ आणि आत्मकेंद्रीपणाचा व्यवहार असतो, तिकडे विरोध हा होतच असतो. लोकांच्या अज्ञानाचा आणि दारिद्र्याचा फायदा उठवून ख्रिस्ती धर्मात रूपांतर करण्याचा आरोपही भैय्याजी जोशींनी केला आहे. जर कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारणार असेल तर आम्हाला आक्षेप नाही. परंतु जबरदस्तीनं धर्मांतर करणं हा गुन्हा असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.

 

Web Title:  Hindu community does not mean BJP says RSS Leader Bhaiyyaji Joshi.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x