22 November 2024 2:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मनसे कार्यकर्त्यांना नोटीस धाडणाऱ्या पोलिसांच्या पोटा-पाण्याची कार्यकर्त्यांकडून काळजी

Mumbai Police, Raj Thackeray, MNS Maha Morcha

मुंबई : राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ९ फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे विराट महामोर्चा काल पार पडला. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मोर्चाद्वारे करण्यात आली. तत्पूर्वी, काही तास आधी मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे स्वतः राज ठाकरे मोर्चात सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता.

‘चौक सभांमधून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास कारवाई करण्यात येईल,’ अशा नोटीसा पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पाठवण्यात आल्या होत्या. कलम १४३,१४४ आणि १४९ नुसार प्रतिबंधात्मक कारवाईनुसार या नोटीसा पाठवल्या होत्या. एकूणच मनसेचा मागील इतिहास पाहता सर्वात शिस्तप्रिय मोर्चे काढण्याचा मनसे सर्वश्रुत आहे. मात्र विषय धार्मिक तेढ निर्माण होण्याचा असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे असं वृत्त होतं.

काळेवाडी, रामटेकडी आणि परळगाव येथे ९ फेब्रुवारीला होणाऱ्या मनसेच्या महामोर्चानिमित्त चौकसभा घेतल्या जाणार होत्या. या आयोजित केलेल्या चौकसभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार किंवा गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा शक्यता नाकारता येत नव्हती. शांतात भंग होऊन कायदा व शांततेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरून आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नमूद केलेली नोटीस धाडण्यात आली होती.

मात्र प्रत्यक्ष मोर्च्याच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या मुंबई पोलिसांची तसेच राज्य राखीव दलातील पोलिसांचे बंदोबस्तामुळे जेवणा अभावी हाल होऊ नये म्हणून खास बंदोबस्तावरील पोलिसांच्या अल्पोउपहाराची मनसे कार्यकर्त्यांनी सोय केली होती. इतकंच नव्हे तर पक्षातील कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बंदोबस्ताचा जागेवर जाऊन खाण्याच्या गोष्टी त्यांना दिल्या स्वतःची सामाजिक संवेदनशीलता दाखवली आहे.

 

Web Title:  MNS Maha Morcha Mumbai Police on Duty.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x