22 November 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

अभिनेते सयाजी शिंदेंच्या पुढाकाराने बीडमध्ये रंगणार पहिले ‘वृक्षसंमेलन’

Film Actor Sayaji Shinde,  First Tree Summit 2020, Beed

बीड: सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची संकल्पना आणि वन विभागाच्या सहकार्याने पालवनच्या उजाळ माळराणावर फुललेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पावर जगातील पहिले वृक्ष संमेलन १३ व १४ फेब्रुवारी २०२० रोजी होत आहे. पर्यावरण आणि निसर्गप्रेमी असेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत हे संमेलन होत असून पालकमंत्री धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण प्रेमींसाठी अनोखी मेजवाणी असलेल्या या वृक्ष संमेलनास विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींनी मोठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, कृषीभूषण शिवराम घोडके यांनी केले आहे.

सह्याद्री देवराई व वनविभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या जगातील पहिल्या वृक्ष संमेलनात मान्यवरांचे वृक्ष, वनस्पती, वन्यजीव यांच्यावर व्याख्याने होणार आहेत. १३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११:३० श्रीकांत इंगनहलीकर यांचे ‘ दुर्मिळ वनस्पती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. १२:०५ वाजता सी. बी. साळुंके हे ‘गवताळ परिसंस्था’ परिसंस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. १२:०५ वाजता बसवंत दुमने यांचे ‘पर्यावरन खेळ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले पहिले वृक्ष संमेलन मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात फेब्रुवारीत होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. वृक्ष संमेलन ही नवीन संकल्पना शिंदे यांच्या वृक्ष महोत्सवातून पुढे आली असून, त्यांनी याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी जानेवारी महिन्यात तासभर चर्चा केली होती.

अभिनेता सयाजी शिंदे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले होते की, कदाचित वृक्ष संमेलन ही संकल्पना नवीनच असावी. ३ वर्षांपासून असे संमेलन घेण्याचा विचार होता. वृक्ष लागवड, वृक्ष ओळख, बियाणे आणि पर्यावरणासाठी वृक्षांची आवश्यकता यावर अनुभवी पर्यावरणप्रेमी बोलावे. पर्यावरण साहित्यिक तेथे असावेत. हे सगळे विभागातील विद्यार्थ्यांसमोर मांडावे. जेणेकरून त्यांना पर्यावरण आणि वृक्ष लागवड याचे महत्त्व समजेल. मराठवाड्यातील जंगलसंपदा अतिशय कमी आहे. अशा संमेलनातून जर वृक्ष लागवडीला चालना मिळाली, तर निश्चितपणे येणाऱ्या काही वर्षांत विभाग दुष्काळमुक्त होण्यास मदत होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

दरम्यान, दुष्काळ आणि सर्वांत कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. ही ओळख पुसण्यासाठी बीडमध्ये सह्याद्री देवराईची टीम काम करत होती. पालवण येथील देवराई आता बहरत असून इथल्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून बीडला पहिले वृक्ष संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. भाषणबाजी नाही, माहितीचा खजिना आणि या संमेलनाचे स्वरूप वेगळे आहे. कुठल्याही प्रकारची भाषणबाजी इथे होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला असून केवळ उदघाटन सत्र होणार आहे. त्यानंतर नागरिकांसाठी विविध स्टॉल इथे लावले जाणार असून या स्टॉलद्वारे वृक्षांबाबत माहिती दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

Web Title:  Film Actor Sayaji Shinde organised First Tree Summit 2020 at Beed.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x