22 November 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

काही महिन्यांपासून अनेक राज्य भाजप मुक्तीच्या दिशेने सुसाट: सविस्तर वृत्त

BJP Mukt Bharat, Delhi Assembly Election 2020

नवी दिल्ली: दिल्लीकर मतदारांनी भारतीय जनता पक्षाचा ध्रुवीकरणाचा प्रयत्न फोल ठरवत आम आदमी पक्षाच्या (आप) विकासाच्या धोरणाला एकतर्फी कौल दिला. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरघोस मते देणाऱ्या दिल्लीने विधानसभेत मात्र सलग तिसऱ्यांदा ‘आप’ला निवडून दिले. ‘आप’च्या या लाटेत भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडाला तर काँग्रेसच्या हाती पुन्हा एकदा भोपळा आला आहे.

त्यामुळे पराभवामुळे मागील २ वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेल्या राज्यांच्या यादीत दिल्लीचाही समावेश झाला आहे. २ वर्षात एक दोन नाही तर तब्बल सहा राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांचा निवडणूक विजयाचा करिष्मा ओसरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

डिसेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षाच्या हातून झारखंडही निसटलं. त्यानंतर जोरदा मुसंडी मारण्याचा इराद्याने मोठा प्रचार केलेला असतानाही दोनच महिन्यात पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्षाचा निवडणूक लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांत महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाला हरियाणात सत्ता मिळाली, पण झारखंड राज्य त्यांनी गमावलं. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरूनही भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षात बसावं लागलं.अशा प्रकारे एकापाठोपाठ एका राज्यातून भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे. प्रचार हिंदू राष्ट्रवादावर आधारलेला होता. जम्मू आणि काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यासारख्या निर्णयाच्या जोरावर दिल्लीत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा जोरदार प्रयत्न करून पाहिला.

मागील काही महिन्यांच्या भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्यांच्या हातून ६ राज्यांतील सत्ता गेली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ४ राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या चारही राज्यांत भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवता आलेली नाही. लोकसभा निवडणुकीदरम्यान आणखी एक राज्य भारतीय जनता पक्ष आणि एनडीएपासून दुरावलं. आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष तेलगु देसमबरोबर सत्तेत होती. परंतु निवडणुकीपूर्वीच टीडीपीनं भारतीय जनता पक्षाची साथ सोडली. विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशच्या सत्तेतून भारतीय जनता पक्षाबरोबर टीडीपीसुद्धा बाहेर गेली.

 

Web Title: Delhi Elections 2020 Results BJP loses sixth state assembly election with nine months.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x