25 November 2024 8:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

मनसेची बांगलादेशींच्या वस्त्यांमध्ये घुसून शोध मोहीम; पण सेना बांद्रयात तरी हिम्मत दाखवेल?

MNS Chief Raj Thackeray, Amit Thackeray, Shivsena, Nayan Kadam, Bangaladeshi

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी हिंद्त्वाचा झेंडा उचलून थेट देशातील घुसखोर बांगलादेशी आणि पाकिस्तानींविरुद्ध रणशिंग फुंकलं आहे. मात्र महामोर्चा’नंतर महाराष्ट्र सैनिक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बोरीवली पूर्व चिकुवाडी येथे बांगलादेशी घुसखोर अनधिकृत वस्त्याकरून राहत असल्याचं समजताच स्थानिक महाराष्ट्र सैनिक थेट त्या वस्त्यांमध्ये घुसून कागद पत्रांची झाडा झडती घेत असल्याचं समोर आल्याने स्थानिक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तेथे धाव घेतली.

बोरीवली पूर्व चिकुवाडी येथे मागील अनेक दिवसांपासून काही बांग्लादेशी महिला आणि पुरुष वस्त्या उभारत असल्याचं स्थानिक लोकांकडून समजलं असा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांचा दावा होता. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज थेट चिकुवाडी परिसर गाठत जोरदार आंदोलन आणि मोहीम उघडली होती. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चिकुवाडीतील झोपडपट्टी परिसरात शोध मोहीम राबवत अनेकांची लोकांची चौकशी केली. त्यांची कागदपत्रही तपासली. मागील काही दिवसांपातून या परिसरात बांगलादेशी लोक राहात असल्याचा दावा मनसेने केला. त्यांचा पेहराव आणि बोली भाषा बांगलादेशींसारखी असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या पत्र्याचा शेडमध्ये जवळपास तब्बल ५० कुटुंब राहात असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दावा आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्य़ांनी मागील ३ दिवस या लोकांवर पाळत ठेवली होती. त्यांच्याबाबत माहिती मिळवली होती. त्यानंतर आज त्यांनी या परिसरात आंदोलन तसेच शोध मोहीम सुरु केली.

मात्र आंदोलनादरम्यान स्थानिक बोरीवली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बांगलादेशी घुसघोर राहात असल्याचा दावा मनसेने ज्या वस्तीवर केला त्या वस्तीत राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांकडे आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र आढळले. पण, त्यांची मजूर म्हणून स्थानिक पोलीस ठाण्यात कुठलीही अधिकृत नोंद नाही. ते कामाच्या शोधात कोलकाता, ओदिशामार्गे मुंबईत पोहोचल्याचा इथल्या स्थानिक लोकांचा दावा आहे. मात्र मोलमजुरी करण्याच्या नावाने आलेल्या या बांगलादेशींकडे आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र आढळल्याने त्यांच्या वस्त्या उभारण्याचे मनसुबे असल्याचं स्पष्ट होतं. त्यानंतर या सर्व लोकांचा तपशील पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. तसेच, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

मात्र असेच मोहल्ले आणि वस्त्या बांद्रा परिसर मोठ्या प्रमाणावर असून त्या वस्त्यांनी संपूर्ण बांद्रा स्कायवॉक’ला गराडा घातला आहे. मात्र येथे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून थेट स्थानिक शिवसैनिक मूग गिळून शांत असल्याचं मागील अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. मात्र आता सत्ता हातात असून आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील सर्वकाही निवांत असल्याचं दाखवून, केवळ प्रवक्त्यांमार्फत जे काही करतो ते आम्हीच पहिले तीच परंपरा सजून सुरु आहे असंच म्हणावं लागेल.

 

Web Title: MNS Party Bangladeshi search operation at Chikuwadi Borivali.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x