24 November 2024 4:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

आज आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करत असाल तर लक्षात ठेवा...गॅसचा दर रु. ९१०

MLA Rohit Pawar, PM Narendra Modi, Valentine Day

मुंबई: प्रेमाचा उत्सव मानला जाणारा व्हॅलेंटाइन डे आज उत्साहात साजरा केला जात आहे. महाविद्यालयातील युवकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असतो. युवक-युवती आपापल्या जोडीदाराचा शोध या दिवशी घेत असतात. प्रेम सागरात जोडीदार यथेच्छ सैर करत असतात. अनेकांना हा दिवस का साजरा केला जातो, याची माहिती नसते. तर अनेक जण हा दिवस साजरा करणे म्हणजे पाश्चात्यांचे अंधानुकरण करणे आहे, असे मानतात.

दरवर्षी जगभर १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत भारतातही याचा प्रसार झाला आहे. प्रेमभावना व्यक्त करताना एकमेकांना हाती गुलाबाचे फूल देऊन हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. यामुळे आपोआपच या दिवशी गुलाबाला त्यातही त्याच्या लालजर्द फुलाला मोठी मागणी असते. मात्र अनेकजण स्वतःच्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतात असं देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं.

आपल्याकडे असं म्हटलं जात की प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो. म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या आवडीचे जेवण किंवा खाद्य पदार्थ खाऊ घातल्यास आपल्यातील प्रेमात अधिक भर पडते. मात्र आमदार रोहित पवार यांनी हाच धागा पकडून सर्वांना व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यावेळी केंद्र सरकारला देखील प्रेमाने खोचक टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी महागाईने सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणाऱ्या ९१० रुपये किमतीच्या गॅस सिलिंडरची आठवण करून दिली आहे. त्यात त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे!…हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या… गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.

काय आहे ते नेमकं ट्विट;

 

Web Title: NCP MLA Rohit Pawar criticizes PN Narendra Modi government over valentine day.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x