21 November 2024 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

औरंगाबाद: महाविकास आघाडी, त्यात भाजपचे तनवाणी-बारवाल गट सेनेत; मूळ शिवसैनिकांना गृहीत?

Aurangabad, Sambhajinagar, Kishanchand Tanwani

औरंगाबाद: काही महिन्यांवर आलेली औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत महाविकास आघाडीच्या छताखाली एकत्र लढविणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः शिवसेनेचे विधानपरिषदचे आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली होती. तसेच त्याच अनुषंगाने बैठेका देखील सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर लढवणार की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेप्रमाणे असा प्रश्न त्यांना केला तेव्हा त्यांनी एक धक्कादायक विधान केलं. जेथे हिंदू असतील तेथे हिंदुत्वाच्या मुद्यांवर आणि जेथे मुस्लिम मतदार असतील तेथे त्यांच्या मुद्यांवर असं विधान केल्याने शिवसेनेची प्रचारातील गोंधळाची स्थिती समोर आली आहे. मात्र या निर्णयावर स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज झाल्याचं वृत्त आहे. पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वच ठिकाणी आंदण देऊन इथल्या शिवसैनिकांच्या मेहनतीवर पाणी फिरवत आहे असं म्हटलं आहे. तर या निर्णयाचं समर्थन करणारे अंबादास दानवे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्याने ते सुखी झाले आहेत, मात्र आमचं काय याची चिंता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सतावते आहे. त्यात या निर्णयामुळे शिवसैनिकांना अनेक वॉर्डमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करावा लागणार असल्याने मोठी चलबिचल असल्याचं वृत्त आहे.

औरंगाबाद महापालिकेची निवडणुक तोंडावर आली असतानाच भाजपचे माजी शरहाध्यक्ष किशनचंद तनवाणी हे समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. भाजपच्या शहराध्यक्ष निवडीवरून ते काही दिवसांपासून नाराज होते. मुळचे शिवसैनिक असलेले तनवाणी यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्याला डावललं जातंय असं वाटल्याने त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्यासोबत ६ ते ७ समर्थक नगरसेवकही शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

तनवाणी आणि हे सर्व समर्थ नगरसेवकांसह मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा हादरा बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र यामुळे आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडाव्या लागणार असल्याने त्यात भाजपच्या फुटीरवाद्यांनी देखील जागा खाल्यास मूळ शिवसैनिकांची राजकीय अडचण होणार हे निश्चित मानलं जात आहे.

तत्पूर्वी भाजप समर्थक गजानन बारवाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. गजानन बारवाल यांनी २०१४ महानगरपालिका निवडणुकीत ११ अपक्ष नगरसेवकांसोबत भाजपला पाठिंबा दिला होता. ते साध्य भाजप कोट्यातून स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे बारवाल हे भाजपचा हात सोडून शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. बारवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

तसेच वार्ड रचना करतांना नियमांकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले गेल्याची चर्चा आहे. मनासाखी सोडत आणि वार्ड रचना व्हावी या साठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप होत आहे. शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे. वार्ड रचना आणि आरक्षण सोडतीमध्ये गोंधळ झाला असेल तर शासणामार्फेत त्याची चौकशी केली जाईल. आणि या चौकशीचा अहवाल औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही पाठवला जाईल अस आश्वासन घोसाळकर यांनी दिले होते.

 

Web Title: Story Aurangabad Seven BJP Corporators and ex city president Kishanchand Tanwani will join Shiv sena Mumbai CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x