25 November 2024 3:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

फडणवीस सरकारच्या ‘त्या करोडो वृक्ष लागवडीचे’ महाविकास आघाडीकडून चौकशीचे आदेश

Sudhir Mungantiwar, samruddha jangal, CM Uddhav Thackeray

मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारनं ५० कोटी वृक्ष लावण्याचा दावा केला होता. यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर दरवर्षी साधारणत: १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या अभियानातून अपेक्षित काम न झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारमधल्या काही मंत्र्यांनी उपस्थित केली होती. त्यांनी या संदर्भात लेखी पत्रदेखील दिलं. त्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिल्यानं विभागाचे प्रधान सचिव येत्या आठवड्यात नागपुरला जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांत किती वृक्ष लावण्यात आले, त्यातले किती वृक्ष जगले, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांपैकी किती देशी होते, किती परदेशी होते, याची चौकशी प्रधान सचिवांकडून करण्यात येईल. दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं आहे. सरकारनं वृक्ष लागवडीची चौकशी करावी. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीचा आढावा घ्यावा, असं त्यांनी म्हटलं.

तत्पूर्वी, भारत सरकारच्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागामार्फत समृद्ध जंगल असणाऱ्या टॉप ८ राज्यांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार या यादीत सिक्कीम, मिझोराम सारख्या छोट्या राज्यांनी अव्वल क्रमांक प्राप्त झाला होता. परंतु, या यादीत महाराष्ट्राला कोणतेही स्थान मिळालेले नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने समाज माध्यमांच्या माध्यमातून केला होता.

दरम्यान, मागील ५ वर्षांपासून आधीच्या फडणवीस सरकारने ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत हजारो कोट्यवधी वृक्ष लागवडीसाठी खर्च केले होते. मग, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राला स्थान का नाही? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. मग फडणवीस सरकारने लावलेली करोडो झाडं गेली तरी कुठे? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

यावर त्यावेळी राष्ट्र्वादीने प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, ‘सर्रास जंगलतोड होतेय. प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. दरवर्षी कोटींच्या संख्येने वृक्षलागवड करूनही महाराष्ट्राची जंगले समृद्ध झाली नसतील तर वृक्ष लागवडीच्या जनजागृतीसाठी निघालेल्या मंत्र्यांनी हजारो कोटी फस्त करून जनतेची फसवणूक केली असंच म्हणावं लागेल असं देखील राष्ट्रवादीने म्हटलं होतं. दरम्यान मागील वर्षात अनेकवेळा दिवसाला करोडो झाड लावल्याचा दावा वारंवार फडणवीस सरकारने जाहिरातबाजी करत केला आहे. मात्र सरकारने खोदलेल्या लाखो विहिरींप्रमाणे, सध्या करोडो झाडं देखील गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने त्याची देखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title: Story CM Uddhav Thackeray government orders inquiry tree plantation program samruddha jangal done Former CM Devendra Fadnavis Government.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x