25 November 2024 3:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

वादग्रस्त वक्तव्यानंतर वारिस पठाण म्हणाले, माफी मागणार नाही!

Story MIM Former MLA Waris Pathan

गुलबर्गा: वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचे झोड उडत आहे. वारिस पठाण यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला असून भाजपाला लक्ष केलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलतना वारिस पठाण म्हणाले की, ‘मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत. भाजपा आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या घाट घालत आहे.’

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटकातील भाषणातील वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागणार नसल्याची भूमिका घेतली आहे. ‘आम्ही फक्त १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी पडू’, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणात केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. प्रसारमाध्यमांनी टीआरपीसाठी वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले. मी माझ्या वक्तव्यावर माफी मागणार नाही, असे वारिस पठाण यांनी म्हटले आहे. भाजप भारतीयांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

वारीस पाठ आंदोलकांना संबोधित करताना म्हणाले होते की, “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं ते म्हणाले आहेत. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी १६ फेब्रुवारी रोजी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे याप्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती. या आंदोलनाच्या अनुषंगाने एमआयएम सुद्धा स्वतःची स्पेस बनवू इच्छित आहे असंच म्हणावं लागेल. त्यासाठी हिंदू मुस्लिम असं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा एमआयएम’चा प्रयत्न असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे.

पुढे ते असं म्हणाले होते की, “केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणं आपण शिकलो आहोत. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल व जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आली आहे, आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या आहेत, तर तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. १५ कोटी आहोत पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा. असं पठाण यावेळी म्हणाले आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं होतं.

 

Web Title: Story MIM Former MLA Waris Pathan refuses to Apologies for his 15 cror vs 100 crore statement.

हॅशटॅग्स

#MIM(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x