22 November 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

पुढील आदेशापर्यंत माध्यमांपासून लांब रहा, एमआयएम'चे वारीस पठाण यांना आदेश

MIM Former MLA Waris Pathan, Aimim President MP Asaduddin Owaisi

नवी दिल्ली : १५ कोटी १३५ कोटींना भारी पडतील असं वक्तव्य करून वाद निर्माण करणारी वारिस पठाण यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांची खप्पामर्जी ओढवलीय. पठाण हे AMIM’चे महाराष्ट्रातले नेते आणि माजी आमदार आहेच. पठाण यांच्या वक्तव्यामुळे ओवेसे हे अत्यंत नाराज आहेत. पुढील आदेशापर्यंत त्यांना माध्यमांना बोलण्यास बंदी घातली आहे. पठाण वारंवार अशी वक्तव्य करतात त्यामुळे वाद निर्माण होतो. त्याचबरोबर समाजात चुकीचा संदेश पसरतो अशी पक्षाची भावना आहे. त्यामुळे त्यांना बोलण्यास बंदी घालण्यात आलीय. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पठाण हे विजयी झाले होते. मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचे झोड उडत आहे. वारिस पठाण यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला असून भाजपाला लक्ष केलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलतना वारिस पठाण म्हणाले की, ‘मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत. भाजपा आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या घाट घालत आहे.’

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटकातील भाषणातील वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागणार नसल्याची भूमिका घेतली आहे. ‘आम्ही फक्त १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी पडू’, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणात केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. प्रसारमाध्यमांनी टीआरपीसाठी वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले. मी माझ्या वक्तव्यावर माफी मागणार नाही, असे वारिस पठाण यांनी म्हटले आहे. भाजप भारतीयांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

वारीस पाठ आंदोलकांना संबोधित करताना म्हणाले होते की, “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं ते म्हणाले आहेत. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी १६ फेब्रुवारी रोजी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे याप्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती. या आंदोलनाच्या अनुषंगाने एमआयएम सुद्धा स्वतःची स्पेस बनवू इच्छित आहे असंच म्हणावं लागेल. त्यासाठी हिंदू मुस्लिम असं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा एमआयएम’चा प्रयत्न असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे.

पुढे ते असं म्हणाले होते की, “केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणं आपण शिकलो आहोत. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल व जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आली आहे, आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या आहेत, तर तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. १५ कोटी आहोत पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा. असं पठाण यावेळी म्हणाले आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं होतं.

 

Web Title: Story Aimim President MP Asaduddin Owaisi not happy with former MLA Waris Pathan ban to speak with media.

हॅशटॅग्स

#MIM(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x