18 April 2025 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

उद्धव ठाकरेंनाच आधी CAA कायद्याबाबत नीट माहिती दिली पाहिजे: काँग्रेस

Congress, Shivsena, CAA, NRC

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आता महाविकास आघाडीत धुसफूस होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA चा अभ्यास करावा, असा सल्ला काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी दिला. त्याआधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उद्धव ठाकरेंनी सीएएचं जाहीर समर्थन करु नये असं म्हटलं आहे.

याबाबत काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी ट्विट करुन म्हटलंय की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सीएए कायद्याबाबत नीट माहिती दिली पाहिजे. २००३ च्या कायद्यानुसार एनपीआर हा एनआरसीचा भाग आहे. त्यामुळे जर एकदा तुम्ही एनपीआर लागू केला तर एनआरसी रोखली जाऊ शकत नाही. तसेच सीएए कायद्याकडे भारतीय संविधानाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे कारण धर्माच्या आधारे नागरिकत्व दिलं जाऊ शकत नाही असं त्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्यांबाबत चर्चा झाली. “सुधारित नागरिकता कायद्याला घाबरायची गरज नाही, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी अर्थात एनआरसी पूर्ण देशात लागू होणार नाही. तर राष्ट्रीय जनगणना नोंदणी अर्थात एनपीआरबाबत देशाची जनगणना दर दहावर्षांनी होते. कायदा लागू झाल्यावर तो धोकादायक वाटला तर वाद होऊ शकतात. एनपीआरमध्ये काही आक्षेपार्य असेल तर आपण बोलू शकतो. काँग्रेससोबत सीएए आणि एनपीआरबाबत चर्चा सुरु आहे,”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

काळ पंतप्रधानांसोबत बैठक संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तेथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधताना म्हणाले की, ‘पंतप्रधानांसोबत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली असून त्यात GST आणि इतर अनेक महत्वाचे विषय होते. मात्र राज्यात CAA अमलात येणार असला तरी त्याला घाबरण्याची अजिबात गरज नसून, हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, ना की कोणाचं नागरिकत्व हिरावून घेणारा कायदा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आज काँग्रेसकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

 

Web Title: Story Congress advice CM Uddhav Thackeray be careful statement CAA otherwise.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony