22 November 2024 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार

Ayodhya, Ram Mandir, Shivsena

मुंबई: शिवसेनेने पुन्हा एकदा चलो अयोध्येचा नारा दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व खासदारांसह अयोध्येत जाऊन रामलल्लांच दर्शन करणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केलीय. उद्धव ठाकरे हे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत. ते विशेष विमानाने अयोध्येत पोहोचतील. दुपारी श्रीरामाचं दर्शन आणि संध्याकाळी शरयू आरती करणार आहेत. हा सोहळा ऐतिहासिक असून सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावे असं आवाहनही त्यांनी केलंय. सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा निकाल दिल्यानंतर गेल्या अनेक दशकांचा हा प्रश्न मार्गी लागला होता. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. या आधी दोन वेळा त्यांनी अयोध्येत जाऊन रामललांचे दर्श घेत शरयूची आरतीही केली होती.

तत्पूर्वी २४ नोव्हेंबर २०१८ रोजी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारा त्यांचा प्रस्तावित दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये असे सांगितले की,’ येत्या ७ मार्च रोजी उद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार आहेत. ७ मार्च रोजी अयोध्येत दुपारी श्रीरामाचे दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यात सामील व्हा.’, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

 

Web Title: Story Chief Minister Uddhav Thackeray will go Ayodhya on 7 March.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x