25 November 2024 1:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री लेखराज भट्टा यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली

Nepal industrial minister Lekhraj Bhatta, MNS Chief Raj Thackeray

मुंबई: नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री लेखराज भट्टा यांनी आज कृष्णकुंजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, या भेटीत इतर कोणत्या विषयांवर चर्चा झाली का याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे सध्या राज ठाकरे यांच्या पक्षाचे राज्य किंवा केंद्रात कोणतंही स्थान किंवा सहभाग नसताना लेखराज भट्टा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे.

स्वतः राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे. आज राज ठाकरे नवी मुंबईतील मनसेने आयोजित केलेल्या ‘पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२०’ला देखील हजेरी लावणार आहेत आणि त्या अनुषंगाने नवी मुंबईत देखील त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

औरंगाबाद दौऱ्यानंतर राज ठाकरेंचा पुढील पक्ष विस्ताराचा दौरा कधी होणार ते निश्चित नसलं तरी मनसेने आगामी औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी स्थानिक पातळीवर सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Web Title: Story Nepal industrial minister Lekhraj Bhatta meet MNS Chief Raj Thackeray Mumbai.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x